मुक्तपीठ टीम
केरळ विधानसभेच्या मतमोजणीतील सुरुवातीचे कल हे एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्षात एक्झॅट ठरताना दिसत आहेत. तिथे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली लढणारी डावी आघाडी सत्तेत परतत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ चांगल्या जागा मिळवतानाच सत्तावंचित राहताना दिसत आहे.
भाजपाने खूप जोर लावल्यानंतर मल्याळी मतदारांनी कमळाला फुलण्यास वाव दिलेला दिसत नाही.
केरळ विधानसभा निकाल – सुरुवातीचे कल
- बहुमताचा आकडा ७१
- डावी आघाडी – ९३
- काँग्रेस आघाडी – ४३
- भाजपा – ०१
एकूण जागा – १४०
केरळबद्दल एक्झिट पोलचे अंदाज काय होते?
• न्यूज २४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला १०२ जागा, यूडीएफला ३५ जागा आणि भाजपाला ३ जागा मिळू शकतात.
• एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला ७१-७७ जागा, यूडीएफला ६२-६८ जागा आणि भाजपाला २ जागा मिळू शकतात.
• इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला १०४-१२० जागा, यूडीएफला २०-३६ जागा आणि भाजपाला २ जागा मिळू शकतात.
• रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला ७२-८० जागा, यूडीएफला ५८-६४ जागा आणि भाजपाला १-५ जागा मिळू शकतात.
• पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलनुसार एलडीएफला ९१ जागा, यूडीएफला ४७ जागा आणि भाजपाला २ जागा मिळू शकतात.