Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात फक्त एका शहरात दिसणार ५८० वर्षांनंतर दिसणारं सर्वात मोठं चंद्रग्रहण!

November 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
lunar eclipse

मुक्तपीठ टीम

५८० वर्षांनंतर सर्वात जास्त काळ चालणारं आंशिक चंद्रग्रहण भारतातील फक्त इंफाळमध्येच दिसणार आहे. १९ नोव्हेंबरला होणारे हे ग्रहण या वर्षातील शेवटचे मोठे चंद्रग्रहण असेल. एकूण ग्रहण सहा तास दोन मिनिटांचे असेल. चंद्राचा ९८ टक्के भाग ग्रहणात राहील.

 

भारतात दिवस सुरू असल्याने हे ग्रहण देशातील बहुतांश भागात दिसणार नाही. हे ग्रहण मणिपूरची राजधानी, इंफाळ आणि त्याच्या सीमावर्ती भागात संध्याकाळी चंद्रावर पातळ रेषेच्या स्वरूपात काही मिनिटांसाठी पाहता येईल.

 

चंद्र ग्रहणाविषयीची महत्त्वाची माहिती

  • भारतीय वेळेनुसार उपछाया असणारे ग्रहण रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल.
  • अस्पष्ट आंशिक ग्रहण दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल.
  • ग्रहणात चंद्राचा ९८ टक्के भाग कक्षेत असेल.
  • त्यानंतर ग्रहण ओसरू लागेल.
  • संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी चंद्र ग्रहणापासून मुक्त होईल.
  • यानंतर ५ वाजून ३४ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल.
  • उपछाया ग्रहणाची सावली इतकी बारीक असते की ती दिसू शकत नाही.
  • भारतातील ग्रहण एक तास सात मिनिटे चालेल.

 

चंद्र आणि पृथ्वीमधील अंतरामुळे ग्रहण लहान-मोठे असतात

  • हे दीर्घकालीन ग्रहण ५८० वर्षांनंतर होणार आहे.
  • १९ नोव्हेंबर रोजी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर जास्त असल्याने हे ग्रहण दीर्घ कालावधीचे असणार आहे. पृथ्वीपासूनच्या अंतरामुळे चंद्राचा वेगही खूप कमी असेल.
  • ग्रहण ही एक सामान्य खगोलीय घटना आहे.

 

जगातील बहुतांश भागात ग्रहण दिसणार

  • १९ नोव्हेंबर रोजी होणारे आंशिक चंद्रग्रहण जगातील बहुतांश भागात दिसणार आहे.
  • ज्यामध्ये हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अंटार्क्टिक महासागर आणि हिंदी महासागर क्षेत्रात दिसणार आहे.
  • १५ दिवसांनंतर ४ डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे.
  • यावर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस खास असणार आहे.
  • या दिवशी आंशिक चंद्रग्रहणाव्यतिरिक्त कार्तिक पौर्णिमा असेल.
  • याशिवाय प्रकाशोत्सवही या दिवशीच होणार आहे. त्यामुळे हा दिवस विशेष मानला जातो.

Tags: imfalIndialunar eclipsemanipurmuktpeethआंशिक चंद्रग्रहणइंफाळचंद्रग्रहणभारतमणिपूरमुक्तपीठ
Previous Post

जय भीम! ‘बाबासाहेब’ कुठेही दिसत नाहीत तरीही ‘आंबेडकरवादी’ चित्रपट कसा?

Next Post

मुंबईत पेन्शनधारकांचे हाल! पेन्शन रजिस्टर आले नसल्यामुळे बँका शिक्षकांना परत पाठवतात!!

Next Post
union bank ghatkopar

मुंबईत पेन्शनधारकांचे हाल! पेन्शन रजिस्टर आले नसल्यामुळे बँका शिक्षकांना परत पाठवतात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!