मुक्तपीठ टीम
ऑस्ट्रेलियाच्या मेलबॉर्नमधील श्री वक्रतुंड विनयगर मंदिर हे सध्या चर्चेत आले आहे. भारताच्याबाहेरील ते एकमेव मंदिर आहे, जे ग्रॅनाइट दगडाने बांधलेले आहे. गणपती बाप्पाचे हे मंदिर नुकतेच एका नव्या रूपात उघडले गेले आहे. या मंदिराची रचना भारतातील जागतिक वारसा असलेल्या तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरासारखी आहे.
मंदिराचे बांधकाम गेल्या वर्षी जूनमध्ये संपणार होते, परंतु कोरोनामुळे ते पुढे ढकलले गेले. १९८८ मध्ये श्रीलंकेत ग्रहयुद्ध सुरू होताच तामिळ हिंदूंना देश सोडून जावे लागले. त्यानी ऑस्ट्रेलियामध्ये आश्रय घेतला. मेलबॉर्नमध्ये दक्षिण भारतीय मंदिर नव्हते, म्हणून लोकांनी मंदिर बांधण्याची निर्णय घेण्यात आला. पण यासाठी कोणाकडेही पैसे नव्हते. मंदिराचे सचिव शान पिल्लई यांनी मूर्ती तामिळनाडूमधून आणली. यानंतर देणग्या मिळण्यास सुरूवात झाली.
मंदिराचे वेगळेपण
• मंदिरासाठी २० कोटी रुपये खर्च झाला आहे.
• येथे गणेश मंदिराशिवाय इतर देवतांची ११ मंदिरेही बांधली आहेत.
• १७ थरात एकावर रचलेले ३५० टन ग्रॅनाइटचे १२०० वेगवेगळे दगड आहेत.
• सर्वात लहान दगडाचे वजन २५० किलो आहे
• सर्वात मोठा दगड ६ टन वजनाचा आहे.
• तामिळनाडूच्या महाबलीपुरममधील १०० कारागीरांनी ग्रेनाइट दगड कोरले होते, त्यानंतर ते ऑस्ट्रेलियाला पाठवले गेले.
पाहा व्हिडीओ: