मुक्तपीठ टीम
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पावसामुळे बुधवारी रात्री कसारा घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झाले असून कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.
या गाड्या रद्द
- सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल
- सीएसएमटी-लातूर स्पेशल,
- सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल,
- सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल,
- सीएसएमटी-गडग स्पेशल,
- सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल,
- सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल
- काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, तर काही ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
Trains short terminated, cancelled, rescheduled and trains short originating on 21/22.7.2021 due to heavy rains between Umbermali – Kasara and between Vangani – Ambernath. (Bulletin3)@RailMinIndia pic.twitter.com/prqvn95Fs7
— DRM MUMBAI CR (@drmmumbaicr) July 22, 2021
लोकल सेवेवर परिणाम
- राज्यात बुधवार रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
- उंबरमाळी रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर नाही थेट प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत पाणी साचलं आहे.
- मध्य रेल्वेने रात्रीपासून या रेल्वे स्थानकातून होणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद केलीय.
- इगतपुरी आणि खर्डीदरम्यानची रेल्वे वाहतूक सुद्धा रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने थांबवण्यात आलीय.
- मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंबरनाथ-लोणावळा या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
- अंबरनाथ ते सीएसएमटी, टिटवाळा ते सीएसएमटी या रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक सध्या सुरु आहे.
- पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरु आहे.
CR monsoon updates at 6.15am on 22.07.2021 @RailMinIndia pic.twitter.com/XMfLSV70ym
— Central Railway (@Central_Railway) July 22, 2021