Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home करिअर

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती २०२१

भूकरमापक तथा लिपीक पदाची परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार

November 25, 2022
in करिअर, घडलं-बिघडलं
0
Land Records Department

मुक्तपीठ टीम

भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा २८, २९ आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र २मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. 29 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र २ मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.
सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.
भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ०९/१२/२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याकामी दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्विकृतीचे काम करण्यात आलेले होते.

०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची माहिती (DATA) प्राप्त झालेनंतर सदर DATA ची प्राथमिक तपासणी केली असता भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक पदाकरीता जाहिरातीत नमूद अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी देखील अर्ज सादर केल्याचे दिसून आले. तसेच उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरीता अर्ज सादर करण्याबाबत सूचना असून देखील काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विभागाकरीता अर्ज सादर केलेले दिसून आले. या कारणास्तव विभागाकडून २८/०२/२०२२ ते १३/०३/२०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवित दुबार अर्ज भरलेल्या उमेदवारांना कोणत्याही एकाच विभागातील अर्ज कायम करण्याची तसेच अर्हता धारण करत असल्याबाबत प्रमाणपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार ज्या उमेदवारांनी दिनांक ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे तसेच छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांच पदभरती प्रक्रियेतील परीक्षेस बसण्याकरीता पात्र करण्यात येईल. जे उमेदवार अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड करुन छाननी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, अशा उमेदवारांना पदभरती परीक्षेसाठी अपात्र समजण्यात येईल, अशी सूचना एस एम एस द्वारे तसेच विभागाकडून देण्यात आलेली होती.


Tags: careerDirect Service RecruitmentLand Records DepartmentLand Surveyor and Clerk Postmuktpeethकरिअरघडलं-बिघडलंभूकरमापक तथा लिपीक पदभूमी अभिलेख विभागमुक्तपीठसरळसेवा भरती
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

Next Post

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Hon’ble Cm Sir meeting with World Bank Committee-1

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!