मुक्तपीठ टीम
सुपर कार…अवघ्या साडेतीन सेकंदात शंभर किलोमीटरचा वेग. इटलीची जगविख्यात ऑटोमोबाइल कंपनी लॅम्बोर्गिनी सध्या भारतीय बाजारास महत्व देतेय. भारतीय बाजारातील आपल्या पोर्टफोलिओला अपडेट करत आणखी एक जबरदस्त मॉडेल हुरकन एव्हो आरडब्ल्यूडी स्पायडर या स्पोर्ट्स कारला लॉन्च केले आहे. अतिशय आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमतेनी सजलेल्या या सुपरकारची किंमत ३ कोटी ५४ लाख रुपयांनी सुरुवात होणार आहे.
भारतीय बाजारात लॅम्बोर्गिनीची दुसरी सुपर कार
• हुरकन एव्हो आरडब्ल्यूडी स्पायडरची ग्लोबल लॉन्चिंग गेल्या मे महिन्यात झाली आहे.
• भारतीय बाजारात हुरकन कुपे मॉडेल आधीपासूनच आहे.
• कुपे मॉडेलची किंमत ३.२२ कोटी रुपये एवढी आहे.
• गेल्या एका वर्षात लॅम्बोर्गिनीने भारतीय बाजारात आणलेली ही दुसरी कार आहे.
आरडब्ल्यूडी स्पायडरचे खास वैशिष्ट्ये
• या सुपरकारमध्ये कंपनीने ५.२ लीटरच्या क्षमतेच्या नॅचरल एस्प्राइटेड व्ही १० इंजिनचा वापर केला आहे.
• जे ६०२ बीएचपीची पॉवर आणि ५६० एनएमचे टॉर्क जनरेट करते.
• ही कार साडेतीन सेकंदामध्ये ताशी १०० किलोमीटर वेग पकडू शकते.
• तसेच या कारचा टॉप स्पीड ताशी ३२४ किलोमीटर आहे.
• हुरकन स्पायडर डिझाइन आणि लुकच्या दुष्टीने कूपे मॉडेलसारखी आहे.
• त्याचे वजन १२० किलोग्रामहून अधिक आहे.
• कंपनीने यात कूपे मॉडेल सारखी केबिनदेखील दिली आहे.
• कारमध्ये ८.४ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, जिला अॅपल कार प्ले आणि अॅमेझॉन अलेक्साला जोडले जाऊ शकते.
पाहा व्हिडीओ: