Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ठाण्याच्या सांस्कृतिक वारशाचं टाऊन हॉल कायापालटानं वाढलं वैभव, प्रदर्शनाचं कोंदण!

May 6, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Konkan Divisional Development Exhibition in thane townhall

अजय जाधव

ठाणे येथे टाऊन हॉलमध्ये सुरू असलेल्या कोकण विभागीय विकास प्रदर्शनाला सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. शतकी वाटचाल करणाऱ्या टाऊनहॉल बरोबर असलेले सामान्य ठाणेकरांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी हे विकास प्रदर्शन खूपच उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नागरिक टाऊन हॉलचे बदलेले रुपडे पाहून हरखून जात आहेत. मंगळवारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी या विभागीय प्रदर्शनाला भेट दिली आणि ठाण्यातल्या ज्येष्ठ संपादक, पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेल्या कपूर साहेबांच्या वागण्या बोलण्यातला साधेपणा अनेकांना सुखावून गेला.

टुमदार कौलारू बंगला असलेला टाऊन हॉल या शहराची सांस्कृतिक ओळख बनून गेला आहे. या पुरातन वास्तुचे नुतनीकरण करताना त्यांचे पुरातन सौंदर्य जपत त्याला आधुनिकतेचा साज चढविण्यात आल्याने वास्तू आणि हॉल ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे.

मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीचे नूतनीकरण इतक्या सुंदर पद्धतीने करण्यात आले आहे की टाऊन हॉल सारखी सुंदर वास्तू मी पाहिली नाही. अशी ही सांस्कृतिक वारसा समृद्ध करणारी वास्तू आमच्या विभागीय प्रदर्शनासाठी मिळाली याचे समाधान असल्याची भावना प्रधान सचिव दीपक कपूर यांनी यावेळी व्यक्त केली. या वास्तुचे प्राचीन सौंदर्य जपत हुबेहुब दगडी बांधकामासाठी खास नेवासा येथून दगड आणून काम करणाऱ्या ठेकेदार मोहन पाटील यांनी यावेळी प्रधान सचिव श्री. कपूर साहेबांचा सत्कार केला.

प्रदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी कलाकार धनंजय माने यांनी साकारलेली रांगोळी लक्षणीय ठरली. सायंकाळी चारच्या सुमारास श्री. कपूर यांचे प्रदर्शनस्थळी आगमन झाले. कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी त्यांचे स्वागत केले. टाऊन हॉलच्या दगडी बांधकामाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी असलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीवर शासनाच्या विविध विभागांनी केलेली कामगिरी सचित्र मांडण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या थीमला साजेशी अशी जागा निवडल्याबद्दल महासंचालकांनी समाधान व्यक्त केले. प्रदर्शन पाहिल्यानंतर महासंचालकांनी ठाण्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, मिलिंद बल्लाळ आणि पत्रकार यांच्याशी संवाद साधला.

स्थानिक पातळीवरील घडामोडी शासनापर्यंत पोचविण्यात स्थानिक दैनिकांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून अचूक माहिती व जनतेची मते शासनाला कळतात. त्यामुळे लघु व मध्यम दैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व विभागाच्या राज्यमंत्री आग्रही आहेत. लहान-मोठ्या दैनिकांच्या पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, मागील तीन महिन्यात पत्रकारांच्या वैद्यकीय बिलांची कामे तातडीने निकाली काढण्यात आली आहेत. पत्रकारांसाठी आणखी कोणत्या कल्याणकारी योजना आणता येतील यावर विचार सुरू असल्याचे प्रधान सचिव श्री. कपूर यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी प्रदर्शनस्थळी असलेल्या अभिप्राय नोंदवहीत आपला अभिप्राय नोंदविला.

उच्चपदस्थ व्यक्ती ह्या त्यांच्या अनुभवाने, कर्तृत्वाने मोठी बनतात. सामान्य नागरीक, सहकारी यांच्याविषयी असलेल्या संवेदनशीलतेमुळेही ते लक्षात राहतात. याचा अनुभव काल आला. प्रधान सचिवांच्या भेटीचे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार धनंजय कासार छायाचित्रण करीत होते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते टाऊन हॉलकडे जायला निघाले. छायाचित्रकार कासार यांना त्यांनी लगबगीने जाताना बघितले. प्रदर्शन पाहत असताना प्रधान सचिवांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतानाची धडपड ते पाहत होते. पत्रकारांशी संवादानंतर समुह छायाचित्र काढण्यात आले. त्यानंतर विभागीय कर्मचाऱ्यांसमवेत देखील समूह छायाचित्रण झाले. युवा पत्रकार देखील आम्हाला तुमच्या सोबत छायाचित्र काढायचे असे श्री. कपूर यांना म्हणाले. सगळ्यांचे छायाचित्रण झाल्यानंतर शेवटी प्रधान सचिव छायाचित्रकार कासारांना म्हणाले, इकडे या माझ्या सोबत फोटो काढा. गेल्या दोन तासापासून तुमची लगबग मी पाहत आहे. प्रधान सचिवांच्या ऑफरमुळे कासार हरखून गेले. दोघांचाही फोटो झाला. त्यानंतर कपूर साहेबांनी आपल्या पर्सनल ट्विटर हॅण्डलवरून प्रदर्शन आणि पत्रकार संवादाविषयी फोटो आणि मजकूर ट्विट केला. इतकेच नाही तर छायाचित्रकार कासार यांच्या धडपडीचे कौतुक करीत त्या दोघांचा फोटो ट्विट करून कपूर साहेबांनी सुखद अनुभव दिला.

(अजय जाधव हे ठाणे जिल्हा प्रशासनात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: IAS Deepak KapoorKonkan Divisional Development ExhibitionthaneTown Hallकोकण विभाग विकास प्रदर्शनटाऊन हॉलठाणेदीपक कपूर
Previous Post

लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वात आदरांजलीसाठी १०० सेंकद कोल्हापूर स्तब्ध!

Next Post

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके, समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ

Next Post
समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ 1

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके, समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!