मुक्तपीठ टीम
सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. दुचाकी उत्पादक ई-स्कूटर ग्राहकांसाठी वेगवेगळे नवीन पर्याय आणत आहेत. दिल्ली बेस्ड इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी कोमाकीही आपली स्कूटर बाजारात आणत आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात कोमाकी एसई इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती.
या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे यात दर तासाला ८५ किलोमीटरचा टॉप वेग मिळतो आणि ती सिंगल चार्जवर ९५ ते १२५ किमीची रेंज देते. या स्कूटरच्या मॉडलमध्ये तीन रंग उपलब्ध आहेत. या स्कूटरमध्ये एक फ्रन्ट स्टोरेज स्पेस, तीन राइडिंग मॉड्स, डेडिकेटेड क्रूझ कंट्रोल, ऑनबोर्ड सेल्फ डायग्नोसिस, एलईडी डिस्प्ले, इनबिल्ट ब्लूटूथ स्पीकर, मल्टीमीडिया कंट्रोल स्विच हे पर्याय उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल्यास, १० हजार रुपयांच्या डाउनपेमेंटद्वारे ही स्कूटर खरेदी करता येते. या स्कूटरची किंमत ९६,००० रुपये आहे. १०,००० रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर तीन वर्षांसाठी ८६,००० रुपये कर्ज घ्यावे लागेल, ज्यावर ९.७ टक्के व्याज दर लागू होईल. एकूण १,११,०२४ रुपये द्यावे लागतील, त्यातील २५,०२४ रुपये व्याज असेल. तर दरमहा ३,०८४ रुपये ईएमआय द्यावा लागेल.
पाहा व्हिडीओ: