उदयराज वडामकर/ कोल्हापूर
अक्षयतृतीयेचा दिवस कोल्हापुराच गाजला तो शिवजयंतीच्या जल्लोषानं. अवघं कोल्हापूर भगवंमय झालं होतं. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषानं अष्टदिशा दुमदुमत होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोल्हापुरात अभूतपूर्व जल्लोष उत्साहात साजरी झाली. भगवे झेंडे आणि भगव्या पताकांनी अवघं शहर सजवलं होतं. छत्रपती शिवरायांवरील गीतांचा आवाज अष्टदिशांमध्ये घुमत होता. प्रचंड उत्साहात आणि अभूतपूर्व जल्लोषात मिरवणुका निघाल्या. लाखोंच्या मुखातून होणारा शिवरायांचा जयजयकारानं आसमंत दणाणला होता. डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईसह निघणाऱ्या मिरवणुकांध्ये हजारोंच्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झाले होते. गेली दोन वर्ष कोरोनामुले सर्वच सणउत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळे आता शिवजयंती अधिकच जल्लोषात साजरी झाली.
पारंपारिक तिथीप्रमाणे शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. प्रबोधनात्मक फलक, रिक्षावर लावलेले फलक यांच्यावरील संदेश लक्ष वेधून घेत होते. शहरातील संयुक्त मंगळवार पेठ ,संयुक्त रविवार पेठ, संयुक्त उत्तरेश्वर पेठ , संयुक्त राजारामपुरी उपनगरात ही शिवजयंती उत्साहात पार पडली. तालीम मंडळे संस्था, तरुण मंडळाच्या वतीने गेले आठवड्यावर शिवजयंतीची सोहळा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
धनगरी ढोल आणि मर्दानी खेळाच्या आखाडाने पारंपरिक मराठी पोशाखात आलेल्या युवक युवतींनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करून शिवरायांना वंदन केले. मिरवणूक पाहण्यासाठी आबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पण लोकांच्या उत्साहापुढे, जल्लोशापुढे हा त्रास कुणालाच काहीच वाटत नव्हता.
पाहा व्हिडीओ: