कोल्हापूरात इमारत बांधकामांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आलीय. राज्य शासनाने तयार केलेली ही नवीन विकास नियमावली आता कोल्हापूर शहराच्या विकासासाठी उपयोगी ठरेल. सध्या, २०१६ च्या नियमांनुसार, विकासक ३५ मीटर म्हणजे ११ मजली उंचीच्या इमारती बांधू शकतात. शहरात सध्या अशा फक्त तीन इमारती आहेत.
नवीन नियमावलीनुसार ७० मीटर उंचीच्या म्हणजेच सुमारे २३ मजल्यांच्या इमारती बांधणं शक्य होईल. यामुळे कोल्हापूरसारख्या वाढणाऱ्या शहरांमध्ये परवडणारी घरे बांधणं शक्य होईल. मात्र, त्याचवेळी उंच इमारतींच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक यंत्रणा उभारणं आवश्यक मानलं जातंय. तसंच गाड्यांच्या पार्किंगसाठीही आवश्यक सोय करण्याची गरज आहे. तसेच यापूर्वी बांधलेल्या इमारतींच्या तुलनेत मुख्य ठिकाणी अशा इमारती अधिक खर्चिक ठरतील असे विकसकांनी नवीन नियमांचे स्वागत करत सांगितले. तर ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ शशिकांत फडतरे यांनी अशा इमारतींमुळे शहरातील मर्यादित स्त्रोतांवर ताण पडेल असा इशारा दिलाय.
कोल्हापूर महानगरपालिकाच्या (केएमसी) सध्याच्या उंच इमारतींमध्ये राहणे हे लोकांसाठी एक आव्हान ठरणार आहेत. उंच इमारतीमध्ये राहणाऱ्यांना पाणीपुरवठा, आगीसारख्या आपत्तींचे निवारण करणे कठीण जाते. त्यामुळे उंच इमारती बांधण्याची परवानगी देण्यापूर्वी अशा समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे विकासकांनी नवीन नियमांचे स्वागत केले आहे. “नवीन नियमांमुळे विकासकांना परवडणारी घरे बांधण्यास मदत होईल. सध्या मागणी हा मुद्दा आहे. पण परवडणारी घरे विकासांना चालना देतील. तसेच नवीन नियमामध्ये कोणतेही अडथळे नाहीत त्यामुळे, बऱ्याच प्रकल्पांना त्वरित मंजुरी मिळेल, असे विकासकांचे म्हणणे आहे.