मुक्तपीठ टीम
कोल्हापूर-मुंबई दरम्यान सकाळीही विमानांचं उड्डाण व्हावे अशी मागणी नेहमीच होत असते. त्यानुसार सकाळच्या वेळेच्या नियोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तसे शक्य होईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावरील अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर दिली आहे.
विमानतळाच्या विकासासाठीच्या स्थानिक सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली. पाटील यांच्या व्यतिरिक्त खासदार संजय मंडलिक, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह तज्ज्ञ व अधिकारी उपस्थित होते. धावपट्टी विस्तार, रात्रीचे लँडिंग व इतर पायाभूत सुविधांशी संबंधित गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
सध्या मुंबईसाठी उड्डाण सेवा आठवड्यातून तीनदा दुपारच्या वेळेस आहे. प्रवासी सकाळच्या विमान सेवेसाठी मागणी करीत आहेत. पाटील यांनी सांगितले की, “मी गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील विमानतळ अधिकाऱ्यांशी सकाळच्या विमानसेवेविषयीच्या परवानगीबाबत चर्चा करीत आहे.”
सध्या कोल्हापूर हवाईमार्गे बंगळुरु, मुंबई, तिरुपती आणि हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांना जोडले आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून कोल्हापूर विमानतळावर सर्वाधिक प्रवाशांची ये-जा झाली आहे.
पाहा व्हिडीओ: