मुक्तपीठ टीम
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचे मतदान दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानासाठी ठरवून दिलेल्या १२ पैकी १ पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या दिवशी मतदान करण्यासाठी येताना मतदारांनी मतदान ओळखपत्राशिवाय ओळखीचा कोणताही एक पुरावा सोबत घेवून येणे आवश्यक असल्याचे, २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी कळविले आहे.
मतदानासाठी आवश्यक असणारे १२ पुरावे (मतदान ओळखपत्राशिवाय)
आधार कार्ड, रोजगार हमी कार्ड (मनरेगा जॉब कार्ड), बॅंकेचे /पोस्टाचे फोटोसहीत प्रमाणित केलेले पासबुक, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालविणेचा परवाना, पॅन कार्ड, RGI under NPR अंतर्गत देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट (परदेश प्रवासाचा परवाना), निवृत्ती वेतन आदेश (फोटोसहीत), केंद्र शासन / राज्य शासन / निमशासकीय / सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी येथे सेवेत असलेल्या,नोकरीचे ठिकाणचे ओळखपत्र, लोकसभा /राज्यसभा सदस्यत्वाचे कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण विभागामार्फत देण्यात आलेले अपंगत्वाचे ओळखपत्र (Unique disability ID) हे पुरावे घेवून यावे, असे निवडणूक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.