मुक्तपीठ टीम
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीला १५ जागांपैकी ११ जागा मिळवल्या आहेत. . सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा यांच्या आघाडीला शिवसेनेने आव्हान देत अतितटीची लढत दिली. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच विजय झाला आहे.
अंतिम निकाल
- कागल – आमदार हसन मुश्रीफ
- गगनबावडा -आमदार सतेज पाटील
- करवीर आमदार पी एन पाटील
- चंदगड आमदार राजेश पाटील
- राधानगरी -ए वाय पाटील
- हातकणंगले -अमोल महाडिक
- शिरोळ -नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर
- पन्हाळा -आमदार विनय कोरे
- शाहूवाडी – रणवीर गायकवाड
- भुदरगड -रणजीतसिंह पाटील
- आजरा -सुधीर देसाई
- गडहीग्लज -संतोष पाटील
प्रक्रिया गट
- खासदार संजय मंडलिक
- बाबासाहेब पाटील असुलेकर
पतसंस्था गट
- अर्जुन आबिटकर
इतर शेती संस्था गट
- भैय्या माने
इतर मागासवर्गीय
- विजयसिंह माने
भटक्या विमुक्त जाती जमाती गट
- स्मिता गवळी
महिला
- निवेदिता माने
- श्रुतिका काटकर
अनुसूचित जाती व जमाती गट
- आमदार राजू बाबा आवळे
बिनविरोध निवडून आलेले सत्ताधारी
- हसन मुश्रीफ
- सतेज पाटील
- पी.एन.पाटील
- राजेश पाटील
- ए. वाय पाटील
- अमल महाडिक
आरोग्य राज्यमंत्री विजयी
- शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ९८ मत तर गणपतराव पाटील यांना ५१ मतं मिळाली.
- आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. सुधीर देसाई यांना ५७ तर अशोक चराटी यांना ४८ मतं मिळाली आहेत.
- पन्हाळा तालुका सेवा संस्था गटातून सत्ताधारी आघाडीचे आमदार विनय कोरे विजयी झाले आहेत.
- शिवसेना आमदार प्रकाश अबिटकर यांचे बंधू अर्जुन अबिटकर यांनी आमदार प्रकाश आवडे यांना पराभूत केलं.
- शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून सत्ताधारी गटाचे भैया माने विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी आघाडीच्या क्रांतिसिंह पाटील यांचा पराभव केला.
- राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीकडून संजय मंडलिक,बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर विजयी झाले. तर, अपक्ष उमेदवार रणवीरसिंग गायकवाड देखील विजयी झाले आहेत.
जिल्हा बँकेत सहा जागा बिनविरोध
- कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
- पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
- कोल्हापूर जिल्हा बँकेच्या १५ जागांसाठी मतदान झाले आहे.
राज्याच्या सत्तेतील मित्र कोल्हापूरमध्ये शत्रू, शत्रू झाले मित्र!
- राज्यात सत्तेत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले.
- काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या तीन पक्षांनी ताराराणी आघाडीसह पॅनेल उभे केले.
- शिवसेनेनं शेकापच्या साथीनं पॅनेल उभं केलं होते.
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यांच्यात लढत झाली.