मुक्तपीठ टीम
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. याला कोजागिरी आणि राज पौर्णिमा असंही म्हणतात. हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. यावर्षी शरद पौर्णिमा १९ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्र आणि प्रकाश पृथ्वीला आंघोळ घालतो, असं मानलं जातं. या पांढऱ्या शुभ्र प्रकाशामध्ये पौर्णिमा साजरी केली जाते. ज्योतिषांच्या मते, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र १६ कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी आकाशातून अमृत वर्षाव केला जातो, अशी आख्यायिका आहे.
शरद पौर्णिमेची शुभ वेळ कोणती?
१९ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून शरद पौर्णिमेला सुरुवात होईल. २० ऑक्टोबरला रात्री ८.२० पर्यंत हा शरद पोर्णिमा असेल.
पौर्णिमेच्या दिवशी का बनवली जाते खीर?
- दुधात लॅक्टिक अॅसिड असतं.
- चंद्राच्या तेजस्वी प्रकाशात दुधात मूळत: असलेले जीवाणू वाढतात.
- चांदीच्या भांड्यात प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते.
- यासाठी खीर चांदीच्या भांड्यात ठेवली जाते.
- शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाश सर्वात तेजस्वी असतो.
- त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री खीर तयार करून मोकळ्या आकाशाखाली ठेवली जाते.