Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयएएस पूजा सिंघल…सर्वात तरुण वयात यूपीएससी…२२ वर्षांचं करिअर आणि आता कारागृह!

May 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Pooja Singhal

मुक्तपीठ टीम

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खाणकाम आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांना अटक केली आहे. मनरेगा घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने याआधी पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानासह, पतीच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. पूजा सिंघल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पती अभिषेक यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास पूजा सिंघल आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली.

कोण आहेत पूजा सिंघल?

  • पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
  • पूजा यांनी वयाच्या २१ व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
  • या यशामुळे त्यांचं नाव लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.
  • यूपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर त्या झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी बनल्या.
  • मूळच्या देहरादूनच्या असलेल्या पूजा यांनी झारखंडमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
  • २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची जवळपास १९ ठिकाणी नियुक्ती झाली आहे.

पूजा सिंघल यांचा कार्यकाळ…

  • पूजा सिंघल यांची पहिली पोस्टिंग हजारीबाग, झारखंड येथे सदर उपविभागीय अधिकारी म्हणून झाली होती.
  • येथील कामामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या.
  • शिक्षण प्रकल्पात पदस्थापने दरम्यान त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला होता.
  • त्यांनी मुलांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये घोटाळे करणाऱ्या टोळीच्या कारवाया उघड केल्या होत्या.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली झारखंडमध्ये पहिल्यांदाच अपंगांचा डेटा गोळा करण्यात आला.
  • रिम्समध्‍ये डायरेक्‍टर अॅडमिनिस्ट्रेशन म्हणून त्‍यांचे कामही वाखाणण्याजोगे होते.

पुजा उपायुक्त असताना वादाच्या भोवऱ्यात…

  • सिंघल जिल्ह्य़ात उपायुक्त असताना त्या वादात सापडल्या होत्या.
  • खुंटी येथील जिल्हा उपायुक्त पदावर रुजू झाल्यानंतर मनरेगा योजनेत १६ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले.
  • या प्रकरणात त्याच्यावर अभियंत्यांशी संगनमत केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
  • त्यानंतर त्यांची पोस्टिंग तेथून चतरा येथे झाली.
  • चतरा येथील पोस्टिंगदरम्यान त्यांच्यावर नियमांविरुद्ध एका एनजीओला सहा कोटी रुपये दिल्याचा आरोप होता.
  • हा मुद्दा आमदार विनोद सिंह यांनी सभागृहात उपस्थित केला.
  • विधानसभेच्या समितीनेही चौकशी केली होती.
  • चतरा येथेच त्यांच्या पोस्टिंगदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
  • यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

पूजा सिंघल यांचे उशिरा प्रमोशन…

  • सिंघल यांची कृषी विभागात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • येथील पदस्थापनेदरम्यान त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना कालबद्ध पद्धतीने पदोन्नती मिळू शकली नाही.
  • नंतर उपायुक्त असताना त्यांच्यावरील आरोपांची विभागीय चौकशी करण्यात आली.
  • विभागीय चौकशीसाठी उद्योग विभागाचे सचिव ए.पी.सिंग यांना कार्यकारी अधिकारी बनवण्यात आले आहे.
  • सिंह यांनी तपासानंतर क्लीन चिट दिली होती.
  • क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांना बढती देऊन कृषी विभागाचे सचिव करण्यात आले.
  • सुमारे तीन वर्षे त्या कृषी खात्यात होत्या.
  • रघुवर दास यांचे सरकार पडल्यानंतर त्यांच्या जागी अबू बकर सिद्दीख यांना सचिव करण्यात आले.
  • त्याचवेळी सिंघल यांची क्रीडा, कला, संस्कृती आणि पर्यटन विभागात नियुक्ती करण्यात आली होती.
  • तेथून त्यांना पुन्हा उद्योग आणि खाण खात्याचे सचिव करण्यात आले.

अनेक घोटाळ्यांत पूजा यांचे नाव!

  • २०१३ मध्ये पलामूमध्ये पूजा उपायुक्त असताना खासगी कंपनीला कठौतिया खाण पट्टा वाटप केला.
  • यावरूनही वाद झाला.
  • त्याची अद्यापही चौकशी सुरू आहे.
  • त्या चतरामध्ये मनरेगा योजनेत दोन एनजीओंना ६ कोटी रु. देण्यावरूनही चर्चेत आल्या आहेत.
  • ही रक्कम मुसळी उत्पादनाच्या नावावर दिली होती, मात्र मनरेगामध्ये अशी तरतूद नव्हती.
  • २००९-१० मध्ये पूजा खूंटी जिल्ह्याच्या उपायुक्त झाल्या तेव्हा मनरेगाच्या १८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत त्यांच्याविरुद्ध १६ गुन्हे दाखल झाले होते.

Tags: EDIAS Pooja SinghalJharkhandआयएएस पूजा सिंघलईडीझारखंड
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE संभाजी राजे छत्रपतींची पुढची दिशा…

Next Post

अंधेरीचा आपला माणूस गेला…सामान्यातून साकारलेलं नेतृ्त्व हरपलं!

Next Post
Ramesh Latake

अंधेरीचा आपला माणूस गेला...सामान्यातून साकारलेलं नेतृ्त्व हरपलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!