Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

नव्या डबल डेकर्स बस असणार तरी कशा? वरच्या मजल्यावर बसून जीवाची मुंबई करा…

August 22, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Best Double Decker Bus By SWITCH Mobility

मुक्तपीठ टीम

डबल डेकर बस! लंडननंतर मुंबईच असं शहर जिथं दुमजली सार्वजनिक बस सेवा आहे. आता स्विच मोबिलिटी लिमिटेडने भारतातील पहिली आणि अनोखी इलेक्ट्रिक डबल-डेकर बस आणली आहे. आपल्या बेस्टने मुंबईकरांच्या प्रदूषणमुक्त आरामदायी प्रवासासाठी २०० डबल डेकर बसेसची ऑर्डरही दिलीय.

भारतात मुंबई आणि डबल डेकर्स हे सार्वजनिक वाहतुकीचे समानार्थी शब्द आहेत. इलेक्ट्रिक डबल डेकर बस लाँच करताना स्विच मोबिलिटी लिमिटेडने वापरलेले हे शब्द समर्पकच. कोणत्याही मुंबईकरालाच नाही तर मुंबईत येणं-जाणं करणारा प्रत्येकजण या डबल डेकर्स बसच्या प्रेमात पडतोच पडतो. आता आपले केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांचंच पाहा ना…

नेक्स्ट जनरेशन, कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलकी व्यावसायिक वाहनं बनवणाऱ्या स्विच मोबिलिटीने नुकतीच आपली स्विच EiV 22 या भारतात लाँच केली. या पहिल्या आणि अद्वितीय इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बसचे अनावरण नितिन गडकरींच्याच हस्ते झाले. भारतात डिझाइन केलेली, विकसित आणि उत्पादित केलेली आणि स्विचच्या जागतिक इलेक्ट्रिक बस अनुभवाचा उपयोग करून बनवलेली स्विच EiV 22 नवीनतम तंत्रज्ञान, अति-आधुनिक डिझाइन, सर्वोच्च सुरक्षा आणि सर्वोत्तम आराम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. नूतनीकृत आयकॉनिक बस देशातील सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ती शहरांतर्गत बस वाहतुकीत एक वेगळं स्थान निर्माण करेल.

स्विच EiV 22 ही जगातील पहिली स्टँडर्ड फ्लोअर, वातानुकूलित, इलेक्ट्रिक डबल डेकर आहे. त्यामध्ये मागील ओव्हरहॅंगवर रुंद दरवाजा आणि मागील पायऱ्या आहेत. या डबल डेकरमध्ये हलक्या वजनाची अॅल्युमिनियम बांधणी आहे. त्यामुळे जास्त प्रवासी ते वजन गुणोत्तर मिळते आणि प्रति प्रवासी प्रति किलोमीटर तुलनेनं वाजवी खर्च येतो. गर्दीनं त्रासलेल्या मुंबईकर बस प्रवाशांसाठी ही नवी बस प्रसन्नतेची एक नवी झुळूक घेणारी ठरणार आहे. कारण सिंगल डेकर बसच्या तुलनेत स्विच इलेक्ट्रिक डबल डेकर एका फेरीत जवळपास दुप्पट प्रवाशांची वाहतूक करू शकते. तिचा प्रदूषण कमी करण्यातही हातभार लागेल. स्विच इंडियाने यापूर्वीच मुंबईत २०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसेसची ऑर्डर मिळवली आहे. त्यामुळे आता लवकरच या बसने प्रवासास करा…आणि मस्त वरच्या मजल्यावर बसून मुंबईची मजा अनुभवा!

कर्ब वजनात फक्त १८% वाढ होते. डबल डेकरचे आर्किटेक्चर जून २०२२ मध्ये सादर केलेल्या स्विच EiV 12 प्रमाणेच 650 V प्रणाली वापरते, जे स्विच e1 मध्ये देखील समान आहे.

समकालीन शैलीदार आणि अंतर्गत आणि बाह्य सुंदर रचनेसह डबल डेकरमध्ये विस्तीर्ण पुढचे आणि मागील दरवाजे, दोन जिने आणि नवीनतम सुरक्षा मानकांचे पालन करणारा आपत्कालीन दरवाजा आहे. एसी भारतातील उष्ण हवामानात प्रभावी शीतकरण देते तर नमूद केलेल्या फूटप्रिंट मध्ये जास्तीत जास्त ६५ प्रवाशांसाठी बसायची व्यवस्था यामध्ये आहे. प्रत्येक आसनावर हलक्या वजनाची उशी आहे आणि आतील भाग प्रवाशांच्या सोयीसाठी कारप्रमाणे आरामदायी आहेत. ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस प्रति बसलेल्या प्रवाशासाठी कमी रस्ता, टर्मिनल आणि डेपो फ्लोअर जागा व्यापत असल्यामुळे शहरी प्रवासासाठी एक आदर्श उपाय सुविधा आहे.

पॉवरिंग स्विच EiV 22 हा 231 kWh क्षमता, 2-स्ट्रिंग, लिक्विड कूल्ड, ड्युअल गन चार्जिंग सिस्टमसह उच्च घनता NMC केमिस्ट्री बॅटरी पॅक आहे. हे शहरांतर्गत वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक डबल डेकरला २५० किमी पर्यंतची श्रेणी पुरवत सक्षम करते. बसचे घटक भारतात तयार केले जातात जे FAME II अनुपालन साध्य करण्यास सक्षम होतील.

भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “देशाच्या वाहतूक व्यवस्थेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून परिवर्तन करण्याची गरज आहे. शहरी वाहतुकीत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करून एकात्मिक ईव्ही दळणवळण परिसंस्थेच्या रुपातून आम्ही कमी कर्बठसा आणि उच्च प्रवासी घनता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हरित उपाय सुविधांसाठी ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह ईव्ही अंगिकाराच्या दिशेने सरकारची दृष्टी आणि धोरणे मदत करणारी आहेत. डबल डेकरला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि मोठ्या स्तरावर प्रवासी आणि समाजाच्या फायद्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यासाठी कटिबद्ध राहिल्याबद्दल मी अशोक लेलँडची उपकंपनी असलेल्या स्विच मोबिलिटीचे अभिनंदन करू इच्छितो.”

हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीज (इंडिया)चे अध्यक्ष अशोक हिंदुजा या सादरीकरणावर भाष्य करताना म्हणाले, “आज मुंबईत स्विच EiV 22 सादर करणे हा हिंदुजा ग्रुपमधील आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. अक्षय ऊर्जा, वित्त आणि शून्य उत्सर्जन वाहतूक यांच्या माध्यमातून नेट झीरो उद्दिष्ट गाठण्यासाठी अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्याचा समूहाचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. आमची नवीन शून्य उत्सर्जन डबल डेकर बस भारत आणि जगासाठी असलेली आमची वचनबद्धता आणखी मजबूत करताना स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्य निर्माण करेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.”

स्विच मोबिलिटीचे अध्यक्ष धीरज हिंदुजा या सादरीकरणाबद्दल बोलताना म्हणाले, “आम्ही भारतात प्रतिष्ठित डबल डेकर परत आणत असताना हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. अशोक लेलँडने पहिल्यांदा मुंबईत १९६७ मध्ये डबल डेकर सादर केली तेव्हा ते भारतीय उत्पादकांमध्ये अग्रणी होते आणि स्विच हा वारसा पुढे नेत आहे. भारत आणि यूके या दोन्ही देशांमध्ये डबल डेकरमध्ये आमच्या मजबूत कौशल्यासह आणि १०० हून अधिक स्विच इलेक्ट्रिक डबलसह यूकेच्या रस्त्यांवर सेवेत असताना आम्हाला केवळ डबल डेकर या आयकॉनला पुन्हा जिवंत करण्यातच आनंद होत आहे असे नाही तर भारत आणि जगासाठी हा फॉर्म फॅक्टर तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला त्यातून बळकटी मिळत आहे.”

स्विच मोबिलिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्विच मोबिलिटी लिमिटेडचे सीओओ  महेश बाबू भारतीय बाजारपेठेसाठी ईव्ही डबल डेकर क्षेत्रामध्ये ब्रँडच्या प्रवेशाबद्दल बोलताना म्हणाले, “आम्हाला भारतातील पहिली आणि अद्वितीय स्विच EiV 22 इलेक्ट्रिक डबल डेकरचे अनावरण करताना आनंद होत आहे. प्रतिष्ठित डबल डेकरचा वारसा कायम ठेवत नवीन युगाच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक आव्हाने पेलण्याचा प्रयत्न केला आहे. स्विच EiV 22 भारतीय परिस्थितीला अनुरूप पद्धतीने डिझाइन आणि विकसित केली आहे. त्याच वेळी ती ग्राहकांना उत्कृष्ट आराम आणि आनंद प्रदान करते.

About Switch Mobility

Switch Mobility is a next-generation electric bus and light commercial vehicle company with the mission to enrich lives through green mobility. A mature start up, Switch was forged from the innovative EV elements of Ashok Leyland, the fourth largest bus OEM in the world, and Optare, the UK bus manufacturer with over a century of expertise in using the latest technologies in bus design. In 2014, Switch (then Optare) introduced the first British built, pure electric buses to London’s roads and since then has put 300 EVs on the road, clocking up over 30 million electric miles in developed and developing markets.

With dedicated teams at our sites in Leeds, UK and Chennai, India, as a Group, our market-leading vehicles are sold in over 46 countries around the globe and combine the best of British and Indian design, technology and engineering to create unique products. Capitalising on our demonstrable experience and proven expertise in light weight architecture, net zero carbon technologies, data analytics, software and customer service, Switch Mobility aims to be the commercial EV provider and employer of choice in the industry. Through its subsidiary OHM, Switch also offers a range of eMaas services, supporting communities in their transition to a zero emission transport network.

To learn more about Switch and view current on the road vehicles and future concepts, find us at www.switchmobility.tech and follow us on

Twitter: @switchEVglobal

Instagram: @switchEVglobal

पाहा:


Tags: Dhiraj HindujaElectric Double Decker BusGood news MorningNitin GadkariSWITCH MOBILITYगुड न्यूज मॉर्निंगधीरज हिंदुजास्विच EiV 22
Previous Post

राज्यात १८३२ नवे रुग्ण, २०५५ बरे! मुंबई ८१८, नाशिक २८, नागपूर १३ नवे रुग्ण !!

Next Post

महाराष्ट्रातील हायड्रेाजन स्टार्टअपला हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासासाठी सरकारी सहाय्य

Next Post
Government support to hydrogen startups in Maharashtra for indigenous development of hydrogen technology

महाराष्ट्रातील हायड्रेाजन स्टार्टअपला हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासासाठी सरकारी सहाय्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!