किशोर तिवारी/ व्हा अभिव्यक्त!
एकीकडे कोरोनाची तिसरी लाट उसळली असतानाच दुसरीकडे अस्मानी आपत्ती आणि सुल्तानी दुर्लक्षामुळे शेती आणि शेतकरी सपाट होत आहेत. सरकारमधील प्रभावशाली मंत्री आपल्या राजकीय प्रभावक्षेत्रापलिकडे लक्ष देत व्यवस्था करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी जेरीस आले आहेत. त्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढत असून सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी आर्त हाक राज्य सरकारच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आहे.
ऐका किशोर तिवारींनी मांडलेल्या व्यथा – वेदना…
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ -पीक विमा कर्जमाफी, हमीभाव, नुकसान भरपाई पतपुरवठा व्यवस्थित व्हावा, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना काळात प्रशासकीय उदासिनतेमुळे शेतकरी प्रचंड संकटात आले आहेत.
सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर सरकारचे दुर्लक्ष होत आहे त्यातच मस्तवाल अधिकारी फक्त महामारीच्या नावावर शेतकऱ्यांना वाळीत ठेऊन पैसे खाण्यात गुंतले त्यातच केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क कमी केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील या गंभीर मुद्द्यावर विरोधकसुद्धा झोपा काढत आहेत.
आता कृषी संकटात विदर्भ, मराठवाडा सोबत खानदेश व उत्तर महाराष्ट्र सुद्धा आला आहे. नापीकीचे संकट पीक पद्धतीत सुधारणा, पर्यावरण बदल, जमीनीचे व पाण्याचे आरोग्य, डाल व तेल बियांच्या तसेच परंपरागत अन्नाच्या पिकाचे क्षेत्र वाढ, शेतकऱ्यांचे उत्त्पन वाढीसाठी जोड धंदे, ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण रोजगार जोड धंदे यावर साधा विचार केंद्र व राज्य सरकार करीत नसल्याने शेतकरी मरत आहेत.
अख्खी ग्रामीण व्यवस्था मागील २ वर्षात रसातळाला गेली आहे तर शेतकरी आत्महत्या भागात कृषी ग्रामीण विकास महसूल आरोग्य विभागात ५० टक्के जागा रिक्त आहे महामारीच्या नावावर हे सुध्दा घरी बसून मजा मारत आहेत सरकारने तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
(किशोर तिवारी हे राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष आहेत.)