मुक्तपीठ टीम
पंजाब नॅशनल बँक आणि अॅक्सिस बँकेसह अनेक बँकांनी नुकतेच एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. देशातील बहुतेक बँका एफडीवर ५ ते ६% पर्यंत व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत यापेक्षा जास्त व्याज हवे असेल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (केव्हीपी) बचत योजनेत पैसे गुंतवण्याचा सुरक्षित पर्याय समोर आहे. या योजनेत सध्या ६.९% व्याज मिळत आहे.
किसान विकास पत्र योजनेत ६.९% वार्षिक व्याज
- या योजनेअंतर्गत एक प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते. जे कोणीही खरेदी करू शकते.
- पोस्ट ऑफिस बॉण्डप्रमाणे याला जारी केले जाते. यावर निश्चित दराने व्याज मिळतो.
- हे देशभर असलेल्या पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येते.
- सध्या यावर ६.९% व्याज दिले जात आहे.
किती पैसे गुंतवता येणार
किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. तसेच, किमान गुंतवणूक १००० रुपये असावी. १०० रुपयांच्या पटीत कितीही रक्कम गुंतवता येते.
योजनेविषयी विशेष माहिती
- किसान विकास पत्र योजनेत, हे प्रमाणपत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते.
- हे एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील हस्तांतरित केले जाऊ शकते.
- संयुक्त खाते उघडण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
- किसान विकास पत्रात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
- यामध्ये सिंगल अकाउंटशिवाय जॉइंट अकाउंट सुविधा देखील आहे.
- अल्पवयीन देखील या योजनेत सामील होऊ शकतात, परंतु त्यावर त्यांच्या पालकांना देखरेख करावी लागेल.
अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी आणि गुंतवणूक
- जर गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर तुम्हाला किमान अडीच वर्षे वाट पाहावी लागेल.
- यात अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. म्हणजेच, अडीच वर्षे या योजनेतून पैसे काढता येत नाही.
- जर किसान विकास पत्रात पैसे गुंतवले तर ते सध्याच्या ६.९ टक्के व्याज दरानुसार सुमारे १० वर्षे ४ महिन्यांनी दुप्पट होतील.
- जर आयकर बचतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही.
- या योजनेत गुंतवणूक करून आयकर सवलतीचा लाभ मिळत नाही.