मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपातील नेत्यांवर आक्रमक चढाई केली. त्यावेळी संजय राऊतांचा जास्त भर हा भाजपाच्या किरीट सोमय्यांवर होता. बुधवारीही त्यांनी ‘बाप-बेटे गजाआड जाणार’ ट्वीट केलं, नंतर पुरावेही देणार असल्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आता दुसऱ्याच दिवशी सोमय्यांनी राजधानी दिल्लीतून पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. सोमय्यांनी ठाकरेंवरील आरोपाचे पुरावे असल्याचे सांगत पायातील चप्पलही हाती घेतली. मात्र, मुलाच्या कंपनीवरील आरोपांबद्दल त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलं. त्यावर पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी जास्त बोलणं टाळलं.
ठाकरेंच्या नावावरील बंगल्याच्या वादाप्रकरणी संजय राऊतांनी तसं काही नसल्याचं काल स्पष्ट केलं. त्यावर किरीट सोमय्या आज बोलले. “किरीट सोमय्याला जोडे मारणार असेल तर मी माझा जोडा संजय राऊतांच्या हातात द्यायला तयार आहे. त्यानी केलेल्या बंगल्यासंबंधी खुलाशाबद्दल मी पुरावे दिले आहेत. त्यांनी याबाबत रश्मी ठाकरेंना याबाबत विचारावं” असा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, “संजय राऊत साहेब, आपण जोड्याने कुणाला मारणार? १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत १९ बंगल्याचा घरपट्टी, दिवबत्ती कर, आरोग्य कर हा रश्मी उद्धव ठाकरे यांच्या अकाउंटमधून डायरेक्ट आरटीजीएस केलेला दिसतोय. अन्वय नाइक आणि उद्धव ठाकरे यांचे जमिनीसंबंध किरीट सोमय्याने खुलासा केला होता. त्यानंतर हे प्रॉपर्टीचे व्यवहार झाले आहेत.” असे पुरावे किरीट सोमय्या
करा आमची चौकशी, पण नाटकं करू नका!
- भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, प्रताप सरनाईक हे मी ‘आरटीआय’ करताना माझ्या बाजुला येऊन बसले.
- त्याचे सगळे फोटो त्यांनीच काढले.
- ते व्हायरल केले.
- मात्र, माझ्यावर कारवाईचा इशारा दिला गेला.
- माहिती अधिकाराअंतर्गत मी मंत्रालयात गेलो, तर तुम्ही नाटक केलं.
- २०१७ मध्ये हेच सगळं तुम्ही मेधा सोमय्यांच्या नावानं सांगितलं होतं.
- आता पाच वर्ष झाली, तेव्हा तुम्ही का सांगितलं नाही? किरीट सोमय्या, मेधा सोमय्या यांच्या सामाजिक कामाची चौकशी करू असं म्हणालात, मग चौकशी का केली नाही?
- करा आमची चौकशी, पण नाटकं करू नका.
- राऊत तुम्ही काल जे सांगितलं, तसंच पाच वर्षांपूर्वी मेधाच्या नावे म्हणाला होता.
- आम्ही खोटं केलेलं नाही, पण ठाकरेंकडे जर त्यासंबंधी अधिक माहिती राऊतांनी दिली असेल, तर खुशाल चौकशी करा.
कोरोना घोटाळ्याची चौकशी नाही, २० वर्षांपूर्वीच्या शौचालयाची का चौकशी?
- कोरोना घोटाळ्याची चौकशी का करत नाही आहात?
- आम्ही दमडीची कुठं काही चूक केलेली नाही.
- याच बाबत २०१७ मध्ये मेधाच्या नावे छापून आलं.
- २० वर्षांपूर्वी शौचालय बांधलं, त्याची नाटकं केली. यांच्याकडे कागद असेल, तर आमची चौकशी करावीच.
- आम्ही अपील पण नाही करणार
नील ज्या कंपनीत,तो तर अगदी छोटा प्रोजेक्ट!
- नील ज्या कंपनीत आहे, तो एक दोन वर्षांपूर्वी त्या कंपनीशी जोडला गेला.
- तो तर अगदी छोटा प्रोजेक्ट आहे.
- तुम्हाला नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचंय.
- चला मी येतो.. खोल्या सॅनिटाईज नसतील तरी चालतील.. पोलिसात तक्रार करायला गेलो, तर तुमचे गुंड आले.. मी कागद देतोय ना.
राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळ्याशी आमचा काहीच संबंध नाही…
- यावेळी सोमय्या यांनी ही गोष्ट सावरुन नेत पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी आमचा दमडीचा संबंध नाही असं सांगितलं.
- सोमय्या म्हणाले की, आम्ही त्या बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही.
- ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल.
- राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही.
- हे मी पुन्हा एकदा सांगतो.
- उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला.
- डीएचएफल घोटाळा पण आम्हीच बाहेर काढला.
- तरीही तर संजय राऊत यांच्याकडे याच्याशी सबंधित डॉक्यूमेंट होते किंवा आहेत तर त्यांना ईडीने इतक्या वेळा बोलवलंय तेव्हा द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात.
हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे!
- मी कर्जतला गेलो.
- तिथे चौकशी केली.
- श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत.
- ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली.
- हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली.
- श्रीधर पाटणकर हे का बोलत नाहीत.
- श्रीधर पाटणकर याच्या नावावर जमीन सलीम याच्या नावावरुन ट्रान्सफर झाली आहे.
- मी तक्रार दिलेली नाही.
- मी फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.
कोरोना घोटाळ्याला ठाकरे सरकार आणि संजय राऊत प्रचंड घाबरलेयत…
- कोरोना घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत एका शब्दानं बोलत नाहीत.
- यासंदर्भातील कागदपत्र मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे.
- पुण्यात कंपनी ब्लॅकलिस्ट करुन त्यांना कंत्राट देणार नाही, असं सांगण्यात आलं होतं.
- मूळ मुद्दा कोरोना घोटाळ्याला ठाकरे सरकार आणि संजय राऊत प्रचंड घाबरलेले आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
संजय राऊतांचं ट्वीट
- शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेवर अपेक्षित तसे न घडल्याने टीका झाली. मात्र, बुधवारीही त्यांनी ट्वीट करत किरीत सोमय्यांना इशारा दिला.
- “बाप बेटा गजाआड जाणार, कोठडी सॅनिटाइझ केली जात आहे!”
- या त्यांच्या ट्वीटला भाजपाच्या मोहित कंबोज यांनी ट्वीटवरच प्रत्युत्तर दिलं.
- “जेल तो सलीम – जावेद जाएँगे !”
बाप बेटे जेल मधे जाणार!
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
जेल तो सलीम – जावेद जाएँगे ! pic.twitter.com/VLQD15hJR2
— Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) February 16, 2022