मुक्तपीठ टीम
मनी लॉँड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसत आहेत. कारण प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी ईडी व सीबीआयने लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर धाड टाकली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांचा ठावठिकाणा विचारणारे ट्विट केल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे.
बंगालमधील तृणमूल नेत्यांवरील कारवाईमुळे वातावरण तापले असतानाच आता या यंत्रणांचा मोहरा महाराष्ट्राकडेही वळला असल्याचे मानले जाते. ईडीने आणि सीबीआयने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर धाड टाकली आहे. आज दोन्ही तपास यंत्रणांचे अधिकारी या रिसॉर्टवर पोहोचले आहेत. किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचे एक ट्विट केलं होतं. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. याआधी गेल्या वर्षी ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतले होते. मात्र, पुढे सोडून दिले होते.
Pratap Sarnaik GAYAB!!??
प्रताप सरनाईक कुठे आहात!!?? @BJP4Maharashtra— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 18, 2021