मुक्तपीठ टीम
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता लोक इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक्स घेण्यास प्राधान्य देत आहेत. बाजाराची मागणी लक्षात घेऊन कायनेटिक ग्रुपने आपल्या लोकप्रिय मोपेड लुनाचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. चांगली गोष्ट म्हणजे याची नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय हे इलेक्ट्रिक वाहन चालवू शकता. कायनेटिक लुनाचं ५० वर्षांनंतर ई-अवतारात पुनरागमन होणार आहे.
कायनेटिक इंजिनिअरिंगने ५० वर्षांपूर्वी लूना लाँच केली होती, जेव्हा त्याची किंमत प्रति युनिट २,००० रुपये होती. कंपनीने सांगितले की लुना लवकरच खूप लोकप्रिय झाली आणि तिची दैनिक विक्री २,००० पर्यंत पोहोचली. त्यानंतर त्याच्या श्रेणीतील बाजाराचा हिस्सा ९५ टक्के होता.
कायनेटिक ग्रुपने एकेकाळी लोकप्रिय मोपेड ‘लुना’ ची इलेक्ट्रिक आवृत्ती बाजारात आणणार आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडने अलीकडेच शेअर बाजारांना सांगितले आहे की त्यांची उपकंपनी कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लवकरच ई-लुना बाजारात आणणार आहे. यासाठी केईएलने चेसिस आणि इतर इलेक्ट्रिक घटकांचे उत्पादनही सुरू केले आहे.