मुक्तपीठ टीम
किआ कॉर्पोरेशनने आपली पहिली इलेक्ट्रिक कार ईव्ही-6 अधिकृत घोषणा केली आहे. ही कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म किंवा ई-जीएमपीवर बेस्ड असेल. कंपनीने कारचे संपूर्ण डिझाइन लूक १५ मार्च रोजी सादर करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
ईव्ही-6 या इलेक्ट्रिक कारमध्ये एक बोल्ड डिजाइन संकल्पना उपयोगात आणली गेली आहे. किआ आता पुढचे लक्ष इलेक्ट्रिफिकेशनवर केंद्रित करत आहे. कंपनीने या डिझाईनला ‘मूव्हमेंट द इंस्पायर’ असे नाव दिले आहे. किआचे ग्लोबल डिझाईन सेंटरचे सीनियर वाइस प्रेसिडेंट करीम हबीब यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ग्राहकांना सहज आणि चांगला अनुभव मिळत त्यांचा प्रवास सुखद व्हावा अशी ईव्ही- 6 डिझाइन केली गेली आहे.”
या कारला रॅशिक विंडस्क्रीनसह एक आकर्षक डिझाइन दिले गेले आहे आणि त्यात स्लोपिंग रूफही आहे. हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहण्यास मिळते. ईव्ही६ मध्ये स्ट्रीमलाइन्ड बॉडीवर्क, फ्लश-माउंटेड डोअर हँडल, अँगुलर रीअर विंडोज, एलईडी हेडलाइट्स तसेच अनन्य ब्रेक लाइट्स आणि टर्न सिग्नल आहेत.
आत्तापर्यंत, किआने ईव्ही- 6 चे तपशील उघड केले नाहीत. अशी अपेक्षा आहे की, किआ ईव्ही६ हुंडाई आयनिक५ प्रमाणेच असेल. म्हणूनच, ईव्ही६ मागील आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह ५८ आणि ७२.६ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह ऑफर केले जाऊ शकते. या ईव्ही- 6 इलेक्ट्रिक कारचे संपूर्ण मॉडेल १५ मार्च रोजी येईल.
पाहा व्हिडीओ: