Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट!

January 16, 2022
in घडलं-बिघडलं
0
khisa film

मुक्तपीठ टीम

‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेतर्फे आयोजित ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात’ ‘खिसा’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वेत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथी ल पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वेत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा वि भागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे अध्यक्ष सुभाष देसाई याप्रसंगी बोलताना म्हणाले, “हा लघुपट यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. ‘प्रबोधनच्या ५०व्या वर्धापनाचे’ औचित्य साधून काय करता येईल? याविषयी सर्व पदाधिका-यांसोबत चर्चा करताना, ‘लघुपट महोत्सव’ करावा असे ठरले, आणि त्यासाठी एकमेव नाव होते ते म्हणजे ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ अशोक राणे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हा पहिला दर्जेदार महोत्सव प्रबोधनने यशस्वी केला. ज्यांनी ज्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे कौतुक. एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा मांडता येते. आणि ‘प्रतिभा’ आहे म्हणून ‘प्रतिमा’ पुढे सादर करता येते. या सर्व प्रतिभासंपन्न कलावंतांचे आभार, त्यांच्या उदंड सहभागामुळे हा लघुपट महोत्सव विशेष झाला, आम्ही यापुढेही प्रत्येकवर्षी हा महोत्सव असाच सुरु ठेवणार असून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत होतील.”

या समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी म्हणाले “टेक्नॉलॉजी येते, फॉरमॅट्स बदलतात, सगळं काही बदलतं, मात्र कलाकार तोच राहतो, थियटर मधून, टेलिव्हिजन, चित्रपटातून सतत वेगळ वेगळ पहात रहा. मी  सर जे.जे.मध्ये फाईन आर्टसला असताना आम्हाला तेव्हा पाचही वर्षे प्रख्यात पेंटर प्रोफेसर प्रभाकर कोलते हे शिक्षक होते, त्यांनी आम्हाला आर्टिस्ट म्हणजे काय हे डिस्कवर करायला लावलं. खरंतर मला पेंटर व्हायचं आणि पॅरिसमध्ये स्वतःचा स्टुडीओ सुरु करायचा, असं सर्वकाही ठरलं होत. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच एक्सपोजर पाहिलं आणि मी चित्रपटांकडे, त्यातील अभिनयाकडे आकर्षित झालो. कलाकार हा एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतो. हा फेस्टिव्हल सुद्धा तुमच्या जीवनात असाच असंच काहीतरी वेगळ घडवणार आहे. ‘प्रबोधन’.. सोबत जोडली गेलेली माणसे मुळात वेगळी आणि दिग्गज आहेत.”

या फेस्टिवलची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण केली असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान्स’, ‘ओबरहौसेन’(जर्मनी), कार्लोवी वेरी(झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.

करोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थित पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या’ अंतिम फेरीचे आयोजन पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते. या प्रसंगी ’५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्याग ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता मात्र जितेंद्र जोशी करोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.

महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार

रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार

रु. ५०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार

रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट

१. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ

२. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर

३. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव

४. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे

५. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे

 

वैयक्तिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरीश बारस्कर – (ताजमहाल)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा सोनावणे – (वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वेदांत क्षीरसागर – (खिसा)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राज मोरे – (खिसा)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक – कैलास वाघमारे – (खिसा)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

khisa film

 

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – किरण जाधव – (लगाम)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर  – (बटर चिकन)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट ध्वनि – अनमोल भावे – (अर्जुन)

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)


Tags: Kailas WaghmareKHISAPrabodhan International Short Film Festivalकैलास वाघमारेखिसाप्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव
Previous Post

“नवे शैक्षणिक धोरण समान संधी आणि दर्जा नाकारणारे”

Next Post

अॅट्रोसिटी तपास अधिकारी बदलण्याच्या प्रस्तावातून राज्य सरकारकडून मूळ कायद्यालाच आव्हान!

Next Post
Antrocity Act

अॅट्रोसिटी तपास अधिकारी बदलण्याच्या प्रस्तावातून राज्य सरकारकडून मूळ कायद्यालाच आव्हान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!