Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँकांमार्फत वेतनाचे धोरण डालवून ठाकरे सरकारकडूनच कर्नाटक बँकेस झुकते माप!

भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांचा पलटवार

December 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
keshav upadhye and uddhav thackeray

मुक्तपीठ टीम

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन कर्नाटक बँकेमार्फत करण्याच्या आदेशावरून गदारोळ करून विरोधकांनी जनतेमध्ये संभ्रम माजविण्याचा कट आखला आहे. सीमावादावरून सुरू झालेल्या संघर्षात तेल ओतून अशांतता माजविण्याचा हा कट असून, कर्नाटक बँकेसोबत यासंबंधीचा करार ठाकरे सरकारनेच केला होता, ही बाब जाणीवपूर्वक लपविली जात आहे, असा आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

यासंदर्भात ८ डिसेंबर २०२१ रोजीच ठाकरे सरकारकडे कर्नाटक बँकेने अर्ज केला होता व २१ डिसेंबर २०२१ रोजी कर्नाटक बँकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. तेव्हा राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आज संभ्रम पसरविणारी महाविकास आघाडी सत्तेवर होती, याकडे उपाध्ये यांनी या पत्रकात लक्ष वेधले आहे.

कर्नाटक बँकेप्रमाणेच २१ जून २०२२ उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेनेही अर्ज केल्यानंतर त्याच तारखेस ठाकरे सरकारने या बँकेसोबत करार केला. महाविकास आघाडी सरकारने बंधन बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, करूर वैश्य तसेच साऊथ इंडियन बँकेसही परवानगी दिली होती, असे त्यांनी सांगितले.

मुळात, शासकीय निधी केवळ राष्ट्रीयीकृत बँकेतच ठेवण्याबाबत शासनाचे धोरण मार्च २०२० मध्येच निश्चित झाले आहे. त्यानुसार खाजगी बँकेतील वेतन, पेन्शन खाती बंद करून केवळ शासकीय बँकेतच ठेवावी असे स्पष्ट म्हटले होते. मात्र ठाकरे सरकारने या धोरणात खोडा घातला. खाजगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्यात यावी, असा आदेश जारी करून महाविकास आघाडी सरकारनेच पुन्हा खाजगी बँकांना परवानगी दिली. आता सीमावादावरून उभय राज्यांत तणाव असताना जनतेमध्ये संभ्रम माजवून तणावाच्या आगीत तेल घालून राजकीय पोळी भाजण्याचा हीन डाव खेळला जात आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला.


Tags: BJPkeshav upadhyeMaharashtraUddhav Thackerayकेशव उपाध्येभाजपा
Previous Post

‘व्हॉइस ऑफ मिडिया’ पत्रकार संघटनेच्या संकेतस्थळाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन, पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

Next Post

नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Next Post
Sudhir Mungantiwar

नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!