मुक्तपीठ टीम
टीव्हीवरील वेगवेगळ्या स्पर्धा कार्यक्रमांमुळे सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभेला वाव मिळत आहे. संपूर्ण जगासमोर जगावेगळ्या प्रतिभेच्या सादरीकरणाची संधी प्रतिभावंतांना मिळत आहे. कानपूर शहराला टॅलेंटचा वारसा आहे असे म्हटले जाते. त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे केबीसी मध्ये आलेली कानपुरची एक कन्टेसस्टंट. ११ वर्षाच्या वंशी चौहानने डोळे बंद ठेवुन वस्तूचा रंग ओळखु शकते तसेच गंधावरून पुस्तक वाचू शकते, असा दावा केला. केबीसीच्या हॉट सीटवर वंशी यशस्वी ठरू शकली नसली, तरी तिने अमिताभ बच्चनना चकित केले. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याला भोंदूगिरी संबोधत आक्षेप घेतला आहे आणि अमिताभ बच्चन यांच्याकडून चुकीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
केबीसीत ‘बिग बी’ही आश्चर्यचकित!
- सध्या ‘कौन बनेगा करोडपती सीझन १३’चा स्टुडंट स्पेशल भाग टेलिकास्ट होत आहे.
- बिग बी अमिताभ बच्चन सहभागी विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि ज्ञान पाहून आश्चर्यचकित होत आहेत.
- स्टुडंट स्पेशल एपिसोडमध्ये जयपूरची वंशी चौहान पोहोचली आणि तिच्यामुळे बिग बी सुद्धा आश्चर्यचकित झाले.
- वंशी केबीसीमध्ये जास्त पैसे जिंकू शकली नाही.
- तिने नंतर १ लाख ६० हजारांवर गेम क्वीट केला.
- डॉक्टर होण्याची इच्छा असलेल्या वंशीने सांगितले की, मी जी रक्कम जिंकेन ती रक्कम माझ्या अभ्यासात खर्च करणार आहे.
- अमिताभ बच्चन यांच्यासोबत केबीसी शोमध्ये सहभागी होणे हा एक मनोरंजक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
वंशी चौहानचा काय आहे दावा?
- डोळ्यांवर पट्टी बांधून वंशीला रंग सांगता येतो.
- पुस्तकाचा वास घेऊन पुस्तक वाचता येते.
- वंशी चौहान ही इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक आणि सायबर ऑलिम्पियाडमध्ये रौप्यपदक विजेती आहे.
- तिला बॅडमिंटन खेळायला आवडते.
- तिच्याकडे संवेदना बदलण्याची अद्वितीय प्रतिभा आहे.
- डोळ्यांवर पट्टी बांधून ती तिच्या गंधाच्या जाणिवेतून पुस्तक वाचू शकते. डोळ्यांच्या स्पर्शाच्या भावनेतून तिला वस्तूचा रंग ओळखता येतो.
- या टॅलेंटबद्दल तीने सांगितले की, मला ही शक्ती बेटर माईंड कोर्स करून मिळाली आहे.
बेटर माइंडकोर्सबद्दल काय आहेत दावे?
- बेटर माइंड कोर्स हा जागतिक कोर्स आहे.
- जो ७ ते ८आठवड्यांचा आहे.
- ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुले यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि याद्वारे मुलांचे मन धारदार केले जाते.
- यामध्ये मुले वास घेऊन गोष्टी वाचतात आणि समजून घेतात.
- वंशीच्या म्हणण्यानुसार, ही जादू नाही, यात ध्यान आणि मेंदूचे व्यायाम समाविष्ट आहेत.
- श्वासोच्छवासाशी संबंधित या व्यायामाद्वारे अशा संवेदना विकसित होतात, ज्या डोळ्यांसाठी काम करू लागतात.
- त्याचा विकास मेंदूच्या व्यायामाद्वारे होऊ शकतो.
काय आहे वास्तव…वाचा अंनिसने मांडलेली भूमिका:
“‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भोंदूगिरीचा प्रचार, अमिताभ बच्चन यांनी चूक दुरुस्त करावी!”