मुक्तपीठ टीम
जम्मू काश्मीर , हिमाचल प्रदेश आणि नेपाळमध्ये अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून मुंबईत पुरवणाऱ्या काही टोळ्यांचा मुंबई पोलीस माग काढत आहेत. या टोळयांमार्फत मुंबई शहरात रेल्वे, बस व खासगी वाहनाने चरस या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून मुंबईत प्रवेश करताना या टोळीच्या चार सदस्यांना २४ किलो अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यांची एक वेगळीच मोडस ऑपरेंडीही उघड झाली. काश्मीरपासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात अंमली पदार्थांचा साठा पकडला जाऊ नये म्हणून ते सोबत महिलांनाही ठेवत असत.
गुन्हे शाखेला सदर टोळया या मुंबईत मोठ्या प्रमाणात चरस हा अंमली पदार्थ पुरवठादारांना पाठवित असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने अशा पुरवठादारांचे रॅकेट उध्वस्त करण्याकरीता पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेतील विविध युनिटस , अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांचेकडुन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
चेंबुर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की ” काही इसम हे त्यांच्या महिला साथीदारांसह काश्मीरमधून चरससह सिव्हर रंगाच्या सेंट्रो मोटार कारमधून मुंबई शहरात विक्री करतात. मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन युनिट ७चे पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम यांनी माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार कक्ष ६ चेंबर युनिटचे पोलीस पथक व कक्ष ७ घाटकोपर युनिटला मिळालेल्या माहितीप्रमाणे दहिसरमध्ये सापळा लावला. तेथे माहिती मिळाल्यानुसार सेंट्रो मोटार कार येताच, ती रोखून ताब्यात घेवून त्यातील २ पुरुष व २ महिला आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे रु . १४,४०,००,००० / – (चौदा कोटी चाळीस लाख रुपये) किंमतीचे २४ किलो चरस जप्त करण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयातील आरोपींनी चरस लपवण्यासाठी नमुद कारमध्ये दरवाज्यांच्या पॅनलमध्ये व डिक्की बॅक पॅनलमध्ये पोकळी बनविण्यात आल्या होत्या. तसेच श्रीनगर काश्मीरवरुन चरस आणताना कोणासही संशय येवू नये म्हणून महिला साथीदारांसह प्रवास करीत होते .
अटक मुख्य आरोपीने नमुद चरस हे श्रीनगर येथून आणल्याचे सांगितले आहे. नमुद अंमली पदार्थ मुंबई शहरात कोणास व कोणत्या डीलर्सना पुरवठा करीत आहेत याबाबत तपास सुरु आहे. सदरची कारवाई ही पोलीस सह आयुक्त ( गुन्हे ) मिलिंद भारंबे , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे व सहाय्यक पोलीस आयुक्त डी पूर्व सोपान निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ७ घाटकोपर युनिटचे प्रपोनि मनिष श्रीधनकर, कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांचे नेतृत्वाखाली सपोनि गावडे , सपोनि चव्हाण , मसपोनि कुदळे , मसपोनि देशमुख , पोउनि मुठे , स.फौ.क्र . २७५३५ / सावंत , स.फौ.क्र . २८१७४ / गायकवाड , पो . ना.क्र .०४०३६३ / शिंदे , पो.ना. क्र . ९ ८०६ ९ ७ / तुपे , पो.ना.क्र .६१२ ९ ४ / आराख , पो.ना.क्र . ९ ७०५४२ / भिलारे , पोना गायकवाड / ०४११३२ , पो . शि . क्र .०८०२ ९ ६ / कोळेकर , पो . शि . क्र . ० ९ ०३१ ९ ७ / पवार , पो . शि . क्र . ११०६४१ / शेख , म.पो.शि.क्र .०८१४२६ / अभंग , पो . ना . चा . क्र ००६७४ / कदम पो . शि.क्र .०८०३३ ९ / इंगळे , पो.ना.चा.क्र . ९ ८०७६५ / डाळे , पोनाचालक ००६७४ / कदम , स . फौ सपकाळ / २७५३ ९ , पो हवा सावंत / ३१७३४ , पो हवा बेंडाळे / १७८३ , पोशि भालेराव / ०७०४०० , पोशि मोरे / ०५०७४२ , पोशि घेरडे / ०६१७०३ पोशि मालवेकर / ०७०७७४ तसेच कक्ष ७ घाटकोपर युनिटचे सपोनि ओलेकर , पोउनि निलेश चव्हाण , पोउनि रामदास कदम पाउनि स्वप्नील काळे , पो हवा क ९ ६०१८३ / मोरे , पो हवा क ३१३४७ / पवार , पोना क ०६१४८३ / सोनावणे , पोना क ०३४६७ / गलांडे , पोशि ०८०७७० / खरे , पोशि ० ९ ०५७२ / पाटील पोना चालक ००६८८ / कदम यांचे पथकाने पार पाडली आहे .
त्यांच्याविरुध्द दहिसर पोलीस ठाणे येथे विस्था गुर क दहीसर पोलीस ठाणे गु.र. २४ ९ / २०२१ कलम ८ ( क ) , सह २० ( क ) , २ ९ एन डी पी एस अॅक्ट १ ९ ८५ अन्वये गुन्हा दाखल करुन सदर आरोपीतांस दि . २५/१०/२०२१ रोजी अटक करण्यात आलेले आहे . नमुद गुन्हयातील मुख्य आरोपीविरुध्द अंमली पदार्थ विरोधी शाखेकडे गुर क ९ ० / २०१० कलम ८ ( क ) , सह २० ( क ) , २ ९ एन डी पी एस अॅक्ट १ ९ ८५ अन्वये गुन्हा दाखल आहे .