मुक्तपीठ टीम
भारत आणि जपानच्या शेकडो वर्ष जुन्या मैत्रीचे प्रतीक असलेले रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र काशी नगरीत तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्याचं उद्घाटन करणार आहेत. हे अधिवेशन केंद्र १८६ कोटी रुपये खर्चून बांधले आहे. रुद्राक्ष जपानी शैलीने सजविण्यात आले आहे. जपानी फुलांचा सुगंध रुद्राक्षात दरवळत आहे. पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरच्या आवारात रुद्राक्ष रोपांची लागवड करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, रुद्राक्ष अधिवेशन केंद्रात इन्डो-जपान कला व संस्कृतीची झलकदेखील पाहायला मिळणार आहे.
जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वांत चैतन्यशील शहर, काशीला जपानकडून भारताला मैत्रिची रुद्राक्षच्या रूपात, मैत्रीची अनोखी भेट दिली आहे. जिथे संगीत मैफिली, परिषद, नाटक आणि प्रदर्शन यासारखे कार्यक्रम आयोजित करता येतील. २०१५मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ असणाऱ्या काशीत आणले तेव्हा या केंद्राची पायाभरणी झाली होती. शिवलिंगाच्या आकाराच्या या केंद्राचे नाव शिवनगरी काशीमुळे रुद्राक्ष ठेवण्यात आले आहे. त्यात स्टीलचे १०८ रुद्राक्ष बसविण्यात आले आहे.
जपानच्या मैत्रीचं प्रतीक, जर्जा ग्लोबल!
- वाराणसीतील सिगरा येथे तीन एकरच्या परिसरात १८६ कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या रुद्राक्षमध्ये १२० गाड्यांचे पार्किंग बेसमेंट असू शकते.
- तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एक हॉल असेल, ज्यामध्ये व्हिएतनाममधून आयात केलेल्या खुर्च्यांवर १२०० लोक एकत्र बसू शकतात.
- अपंगांसाठी दोन्ही दरवाज्याजवळ ६-६ व्हील चेअरची तरतूद आहे.
- याशिवाय स्वच्छतागृहे दिव्यांगांनाही वापरा येतील अशी आहेत.
- याशिवाय आधुनिक ग्रीन रूमही बांधली गेली आहे.
- १५० लोकांची क्षमता असणारे दोन कॉन्फरन्स हॉल किंवा गॅलरी देखील आहेत.
- जे जगातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.
- जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सीकडून रुद्राक्षला वित्तपुरवठा होतो.
- हे डिझाईन जपानी कंपनी ओरिएंटल कन्सल्टंट ग्लोबलने केले आहे.
- हे बांधकाम जपानच्या फुजिता कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीद्वारे देखील केले गेले आहे.
‘रुद्राक्ष’मध्ये पर्यावरण आणि सुरक्षेचीही काळजी!
• रुद्राक्षमध्ये एक छोटी जपानी बाग बांधली गेली आहे.
• ११० किलोवॅट क्षमतेच्या वीजनिर्मितीसाठी सोलर प्लांट बसविण्यात आला आहे.
• व्हीआयपी कक्ष आणि त्यांच्या येण्या-जाण्याचे मार्गही वेगळे आहेत.
• रुद्राक्ष वातानुकूलित ठेवण्यासाठी, इटालियन उपकरणे बसविली गेली आहेत.
• भिंतीवरच्या विटादेखील उष्णता रोखतात
• उत्पादन आणि वापराचे घटक लक्षात घेऊन रुद्राक्षला ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटेट असेसमेंट (ग्रिहा) कडून ग्रेडिंग तीन मिळाली आहे.
• रुद्राक्षात कॅमेऱ्यासह सुरक्षेची जबरदस्त बंदोबस्त करण्यात आला आहे.
• अग्निसुरक्षा उपकरणांवरही विशेष लक्ष दिले गेले आहे.
• त्याचे बांधकाम १० जुलै २०१८ रोजी सुरू झाले होते.