उदयराज वडामकर / कोल्हापूर
आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला सण. या दिवशी दारी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारली जाते. नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसायाला प्रारंभ, सोनं खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. तसेच महाराष्ट्रात शोभायात्रा काढल्या जातात. कोरोना निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा निघू शकल्या नाहीत. पण निर्बंध हटवल्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रातील काही ठिकाणी शोभायात्रा निघत आहेत. कोल्हापूर मधील करवीर गर्जना ढोल पथकातर्फे हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली.
करवीर गर्जना ढोल पथकातर्फे हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा मिरजकर तिकटी येथून भव्य दिव्य स्वरुपात काढण्यात आली. या शोभायात्रेत २०० कलावंत १२० ढोल तसेच ३० पेक्षा जादा ताशांचा समावेश होता.
शोभायात्रेत कोरोना योंद्ध्यांना मानवंदना देण्यात आली. महिलांची बुलेट रॅली, बालचिमुकल्यांची वेगवेगळ्या वेशभूषा स्पर्धा साकारण्यात आल्या. शोभायात्रेचा मार्ग बिंनखांबी गणेश मंदिर ,महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप या ठिकाणी सांगता झाला.
लिंक क्लिक करा आणि पाहा व्हिडीओ: