बॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौत आणि रंगोली चंडेल वर विशिष्ट समुदाय आणि धर्माविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला, या आरोपांच्या चौकशीसाठी आज वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना आणि रंगोली दाखल झाल्या होत्या. सध्या कंगना व रंगोलीचे पोलीस स्टेशनच्या आवातारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कंगनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणे, द्वेष पसरविणे यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी तिला ३ ते ४ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली होती.
कंगनाने आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना आणि रंगोली या दोघींना अटकेपासून संरक्षण देत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कंगना आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली होती.
पोसील ठाण्यात हजर होण्याआधी पोस्ट केला होता हा व्हिडीओ
Why am I being mentally, emotionally and now physically tortured? I need answers from this nation…. I stood for you it’s time you stand for me …Jai Hind 🙏 pic.twitter.com/qqpojZWfCx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 8, 2021
नेमक प्रकरण आहे तरी काय?
कंगना आणि रंगोलीविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम २९४ अ आणि १५३ अ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी कंगना आणि रंगोली सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त झाल्या होत्या. मात्र, यापैकी कंगनाच्या एका ट्विटवर साहिल नामक व्यक्तीने आक्षेप घेत वांद्रे न्यायालयात कंगना आणि रंगोली विरोधात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कंगनावर देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांअंतर्गंत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.