मुक्तपीठ टीम
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीच एका अमेरिकन ट्राऊझर कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. या ट्राऊझरची जाहिरात दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. हा व्हिडीओसमोर येताच वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेली आणि त्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी बॉलीवूडची क्वीन कंगना राणौतने ट्विट करत दीपिकावर निशाना साधला आहे. पण यामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.
कंगनाने भारत, जापान आणि सीरिया येथील तीन प्राचीन महिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या महिलांनी आपल्या आपल्या देशातील पारंपारिक पेहराव घातला आहे. सन १८८५ साली हा फोटो काढलेला आहे.
Appreciation tweet for ancient women who not only represented their individuality but their entire civilisation,cultures and nations. Today if such achievers are to be clicked they will all wear torn American jeans n rags like blouses,representing nothing but American marketing. pic.twitter.com/0k2yjUuF07
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 3, 2021
कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये पुरातन काळातील महिलांचा फोटो शेअर करत लिहिले की, “या महिलांने फक्त आपले व्यक्तीमत्वच नाही तर पूर्ण सभ्यता, संस्कृती आणि राष्ट्राचे ही प्रतिनिधित्व दाखवून दिले आहे. आजच्या काळात यश प्राप्त करणाऱ्या अशा लोकांचे फोटो काढले जातात, ज्यांनी फाटकी अमेरिकन ट्राऊझर आणि ब्लाउज घातले आहे. ते अमेरिकन मार्केटिंगच्या व्यतिरिक्त कोणाचेही प्रतिनिधित्व करत नाहीत”.
कंगनाच्या ट्विटनंतर सोशल मीडिया यूजर्सही मागे न राहात त्यानी कंगना राणौतचे काही जुने फोटो शेअर करुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या जुन्या फोटोंमध्ये कंगना फाटलेल्या ट्राऊझर्स आणि वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसत आहे.
नेटकऱ्यांचे ट्विट
THE HYPOCRISY THO!! https://t.co/tjUnyLTWTl pic.twitter.com/8S72Q5OeVX
— Pk 💫 (@jmsgevr) March 4, 2021
— Smita Paul (@smita_paul) March 3, 2021
representing nothing but foreign marketing 🤣🤣🤣
1. Burberry blue dress
2. Christian Dior Dress & shoes
3. Madison- shirt, Victoria Beckham- skirt
4. Louis Vitton tote pic.twitter.com/4UFC65kFZY— jaitrejait 🏹🚜 (@jaitrejait) March 3, 2021