मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका सेलिब्रिटींनाही बसत आहे. अनेक सेलिब्रिटी कोरोनाशी झुंजत आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतलाही कोरोना झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्वत: कंगनानेच उघड केले आहे. तसेच कोरोनाशी झुंज देऊन विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
कंगनाच्या पोस्टमध्ये काय?
• कंगनाने इंस्टाग्रामवर एक ध्यानधारणा करतानाचा फोटो शेअर करत केला आहे.
• मागील काही दिवसापासून मला थकवा जाणवत होता.
• हिमाचलला जाणाच्या पार्श्वभूमीवर काल मी माझी कोरोना टेस्ट केले होती.
• टेस्टचा रिझल्ट आला असून तो पॉझिटिव्ह आहे.
• मी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.
• या विषाणूने माझ्या शरीरात कधी प्रवेश केला, याबद्दल मला काहीच कल्पना नाही.
• पण मला माहित आहे की, मी या विषाणूवर मात करु शकते.
• जर तुम्ही घाबरलात तर हा विषाणू अधिक बळावेल.
• चला तर मग या कोरोना विषाणू नष्ट करुया. हर हर महादेव!