मुक्तपीठ टीम
आपल्या वागण्या-बोलण्यामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री कंगना रानौतच्या कायदेशीर अडचणी वाढताना दिसत आहेत. आता तिच्याविरोधात नवा गुन्हा नोंदवला गेला आहे तो एका लेखकाच्या लेखनातून काही कल्पना ढापल्याचा. त्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कॉपीराइट उल्लंघनासाठी कंगना रानौतविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, त्यानुसार खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लेखक अशिष कौल यांनी त्यांच्या खटला दाखल केला होता. द वॉरियर हे ‘दीड्डा: द क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाचे लेखक आहेत. आशिष कौल यांनी कंगना रानौत, तिची बहिण रंगोली, निर्माते कमल जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशिष कौल यांनी दावा केला आहे की, ‘दिद्दा: द वॉरियर क्विन ऑफ काश्मीर’ या त्यांच्या पुस्तकावरून कंगना आणि कमल यांनी ‘मणिकर्णिका रिटर्न्स – ग लिजेंड ऑफ दिद्दा’ या चित्रपटाची कल्पना चोरली आहे.
त्यांनी या प्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ४०५,४१५, १२० बी आणि कॉपीराइट एक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा असे आदेश दिले. त्यानुसार खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.