मुक्तपीठ टीम
गाझियाबादची कामाक्षी शर्मा हिची आज जगभरात चर्चा होत आहे. सायबर क्राईम रोखण्यासाठी लोकांना जागरूक करण्याची कामगिरी तिने बजावली आहे. त्याचवेळी ५० हजार पोलीस कर्मचार्यांना सायबर क्राइमचं प्रशिक्षणही तिने दिलं आहे. त्यामुळे कामक्षीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सन २०१९ मध्ये तिने जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत एक महिन्याची मोहीम राबवून आयपीएससह अनेक पोलीस कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले होते.
कामाक्षीचे नाव यापूर्वीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. गाझियाबादमध्ये ओल्ड पंचवटी कॉलनीत राहणारी कामक्षी शर्माने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने २०१७ मध्ये गढवाल विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात बीटेक केले. ती सायबर क्राइममधील तज्ज्ञ आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर नोकरी न शोधता सायबर फसवणुकीपासून वाचविण्यासाठी तिने देशभर जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली.
कामाक्षी छोटं शहर, मोठं काम!
• कामाक्षीचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे.
• वडील रघु शर्मा दिल्लीत खासगी नोकरी करतात.
• आई ममता शर्मा गृहिणी आहे.
• विशेष म्हणजे तिने २०१९ मध्ये ९ सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत कोणत्याही संघटनेशी संबंधित न राहता जम्मूपासून प्रवास सुरू केला.
• जम्मू ते पंजाब, चंदीगड असा प्रवास हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात करत १३ ऑक्टोबर रोजी कन्याकुमारी येथे संपला.
• कामाक्षीने सायबर गुन्हेगारीची माहिती ५० हजार पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.
प्रशिक्षणासाठी परदेशातून बोलावणे
१. प्रशिक्षणासाठी परदेशातून आमंत्रणे येत आहेत.
२. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत प्रशिक्षण दिले.
३. याशिवाय इतर देशांकडूनही कॉल येत आहेत.
४. तसेच, युरोपमधील बर्याच देशांमध्ये सायबर गुन्ह्याबाबत काम केले गेले आहे.
५. सायबर गुन्ह्याविरूद्ध पहिली जनजागृती भारत देशातच करण्यात आली आहे.