भारतीय सैन्याला लवकरच चालता-फिरता किल्ला मिळणार आहे. आश्चर्यचकित होऊ नका, कारण कल्याणी एम-४ हे भारतीय बनावटीचे चिलखती वाहन आहेच तेवढे मजबूत या वाहनाला कोणत्याही स्फोटाने काहीच होणार नाही. भारतात बनविलेले हे चिलखत वाहन ५० किलो टीएनटी स्फोटकांपासून संरक्षण देऊ शकते. यामुळे सैन्याला धोकादायक भागात सुरक्षित पोहोचण्यास मदत होईल. संरक्षण मंत्रालयाने भारत फोर्ज लिमिटेडशी कल्याणी एम-४ चिलखती गाज्यांचा पुरवठा करण्यासाठी १७८ कोटी रुपयांचा करार केला आहे.
कल्याणी एम-४ चालता-फिरता किल्ला का आहे?
१. हे एक चिलखत वाहन आहे ज्यात सैनिकांच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने सुरक्षेवर जोर देण्यात आला आहे.
२. १६ टन वजनाच्या या वाहनात २.३ टन वजन नेणे शक्य आहे.
३. या वाहनात आठ सैनिक बसू शकतात.
४. ४३ डिग्रीचा अॅप्रोच अँगल आणि ४४ डिग्रीच्या डिसेंट अँगलवर सहज कार्य करू शकते.
५. -२० डिग्री ते ५० डिग्री तापमान पर्यंत सतत ऑपरेट करू शकते.
६. त्याची रचना मोनोकॉक आहे. त्यातील आरसे इतके मजबूत आहेत की ते स्निपर आणि अँटी-मटेरियल रायफल्सच्या आगीचा सामना करू शकतात.
७. यात सहा सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. भारतीय सैन्याने घेतलेल्या कोणत्याही वाहनापेक्षा दोनपट शक्तिशाली आहे.
८. कल्याणी एम-४ चा वेग १४० किमी प्रतितास आहे आणि याची रेंज ८०० किमी पर्यंत आहे.
९. यात १६ केडब्ल्यू वातानुकूलन प्रणाली आहे.
१०. हे वाहन मशीन गनच्या आगीला सहज सहन करू शकते.
११. १० केजी अँटी-टँक सुरुंगाचाही त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
पाहा व्हिडीओ: