मुक्तपीठ टीम
वांद्रे म्हटले की ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान असलेलं कलानगर आठवतंच आठवतं. मात्र, त्याच कलानगरच्या जंक्शनवर अनेक वर्षांपासून रहदारीच्या समस्येचा सामना करावा लागत असे. आता मात्र, एक चांगली बातमी आहे. बीकेसीकडून वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीची समस्या आता सुटण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज या जंक्शनवरील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन केलं. लवकरच सर्व मार्गिका सुरु होऊन वाहतूक कोंडी संपू शकेल.
कलानगर नगर उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्घाटन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कलानगर उड्डाणपूल
- कलानगर उड्डाणपुलाचे काम 2017 पासून काम सुरू आहे.
- त्यातील तीनपैकी एका पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
- बीकेसी ते वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणारा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला होईल.
- हा पूल सुमारे ६०४.१० मीटर लांब आणि ७.५० मीटर रूंद आहे.
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कलानगर उड्डाणपूल बांधत आहे.
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण १०३.७३ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधत आहे.
तीन उड्डाणपूल, वाहतूककोंडी गूल
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईत कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन केले.
CM Uddhav Balasaheb Thackeray today inaugurated one arm of the Flyover at Kalanagar Junction in Mumbai. pic.twitter.com/ETI1naWNBB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 21, 2021
- देशातील प्रमुख व्यवसाय केंद्र बीकेसीच्या जवळ बनत असलेल्या कलानगर उड्डाणपुलाला तीन भागात विभागले गेले आहेत.
- त्याअंतर्गत वरळी-वांद्रे सी लिंक ते बीकेसीकडे उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. दुसरा उड्डाणपूल बीकेसीच्या दिशेने वरळी-वांद्रे सी लिंककडे जाण्यासाठी तयार आहे.
- धारावी जंक्शन ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या दिशेने तिसरा उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे.
- तिन्ही उड्डाणपूल तयार झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार आहे.
आज काय झालं?
- उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले
- त्यानंतर शिवडी-वरळी कनेक्टरचे भूमिपूजन झालेय
- एमएमआरडीएला ४.५ किमी लांबीचे आणि १.२० मीटर रुंदीच्या शिवडी-वरळी कनेक्टरचे बांधकामही सरकारने सोपविले आहे.