शुभम दिपक कातुर्डे
– अर्थशास्त्र विषयात M.A. केले असून, सध्या एका फायनान्स कंपनी मध्ये कार्यरत आहे.
कधी कधी….
कधी कधी वाटत,
आपली झोळी आता रिकामी झाली,
होती नव्हती सगळी शिदोरी,
वाटून आता संपुष्टात आली…
कधी कधी वाटत,
इतका कसा मी अरसिक झालो,
काव्याचे थर रचून रचून,
चोथ्या इतका गचाळ झालो…
कधी कधी वाटत,
संपल सगळं होत नव्हत जेवढं काही,
गाळून घेतलेल्या चहा नंतरचा,
उरला-सुरला गाळ झालो…
कधी कधी वाटत,
अस कस खंडित होईल ?
भरलेलं दैवी ऐश्वर्य,
अस सहज कस निघून जाईल ?
कधी कधी मी ही हरवुन जातो,
मग बिथरून का होईना शोधत राहतो,
जुन्या डायऱ्या अन कागदी चिटोरे,
उलटे सुलटे न्याहाळून पाहतो…
कधी कधी असाच मग्न होता,
सूर्य क्षितिजामध्ये बुडताना पाहतो,
अन मनातल्या एका कोपऱ्यात,
पुनः नव्या कवितेचा आरंभ होतो…!!