Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाकरे-केजरीवाल यांना भेटल्यानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा, “२-३ महिन्यात मोठी खळबळजनक बातमी देणार!”

May 27, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
K Chandrashekar Rao

मुक्तपीठ टीम

केंद्रातील भाजपा विरोधात देशातील अनेक राज्यातील विरोधक एकत्र येण्याच्या घडामोडी सध्या सुरु आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय स्तरावर बदलाचा दावा केला आहे. त्याचबरोबर दोन-तीन महिन्यांत ‘खळबळजनक बातमी’ समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. केसीआर यांनी अलीकडेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची बंगळुरू येथे भेट घेतली होती.

काय म्हणाले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव?

  • मी देवेगौडा आणि एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली आहे.
  • आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली.
  • राष्ट्रीय स्तरावर बदल होणार असून तो कोणीही रोखू शकणार नाही.
  • भारत बदलेल…भारत बदलला पाहिजे.
  • देशातील परिस्थिती बदलण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
  • “दोन-तीन महिन्यांनी तुम्हाला खळबळजनक बातमी मिळेल.
  • केसीआर पुढे म्हणाले, ‘अनेक भाषणबाजी केली जाते, अनेक आश्वासने दिली जातात, पण वास्तव काय आहे? उद्योगधंदे बंद पडत आहेत, जीडीपी घसरतोय, महागाई वाढत आहे… शेतकरी, दलित आणि आदिवासी नाखूष आहेत.

केसीआर पंतप्रधानांना भेटणे टाळतायत…

  • विशेष म्हणजे केसीआर यांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘परिवारवाद’वरून हैदराबादवर निशाणा साधला होता.
  • विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये येण्याच्या काही तास आधी केसीआर बंगळुरूला रवाना झाले होते.
  • चार महिन्यांत ही दुसरी वेळ आहे की ते पंतप्रधानांना भेटणे टाळत आहेत.
  • फेब्रुवारीमध्ये, जेव्हा पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते, तेव्हा केसीआर तब्येतीचे कारण देत त्यांना घेण्यासाठी आले नव्हते.

२०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने केसीआर नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी नुकतीच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेतली होती. आता ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटायला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय ते बिहारलाही जातील, जिथे ते मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची भेट घेऊ शकतात.


Tags: cm uddhav thackerayK chandrashekar RaoTelanganaके. चंद्रशेखर रावकेजरीवालतेलंगणामुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

भारतातील मिनी स्वित्झर्लंड!

Next Post

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Next Post
Cabinet Decision 31-03-2022

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!