मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सध्या सर्वत्र फैलाव होणाऱ्या द्वेषपूर्ण विचारांवर त्यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “इतरांच्या विचारांबद्दल सहिष्णू असण्याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने द्वेष पसरवणारे विचारही आपण स्वीकारले पाहिजेत.”
त्यांनी पुढे असेही बजावले की, “चुका करणे, इतरांची मते स्वीकारणे आणि सहिष्णू असणे याचा अर्थ अंधानुरण करणे असा होत नाही. आणि याचा अर्थ असाही नाही की, आपण द्वेषयुक्त भाषणाच्या विरोधात उभे राहू नये.”
गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात न्या. चंद्रचूड यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांचा अंतरात्मा आणि विवेकबुद्धीचे मार्ग ठरवण्याचे आवाहन केले. ऑनलाईन भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना बजावले, “सोशल मीडियाच्या युगात आपल्या कार्याचा दीर्घकाळापर्यंत परिणाम होणार आहे, हे लक्षात ठेवा. तसंच रोज जे काही घडतं त्यामुळे विचलित होण्याची चिंता करू नये.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड म्हणाले, “व्हॉल्टेअरचे प्रसिद्ध विधान आहे की, मी तुमच्या विधानाशी सहमत नाही, परंतु मी तुमच्या बोलण्याच्या अधिकाराचे शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण करीन, आणि हे विधान आपल्या जीवनात समाविष्ट केले पाहिजे.”