मुक्तपीठ टीम
बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री जूही चावला यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात देशभरात 5 जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याविरोधात याचिका दाखल केली आहे. तिने याचिकेत दावा केला आहे की 5 जी वायरलेस नेटवर्कमुळे पृथ्वीवर कोणताही मनुष्य, प्राणी, पक्षी आरोग्यदायी जीवन जगू शकणार नाहीत. न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वत: ला दूर केले. दुसर्या खंडपीठासमोर हे प्रकरण हस्तांतरित करताना त्यांनी पुढील सुनावणीसाठी २ जूनची मुदत दिली आहे.
हेही वाचा: ‘5जी तंत्रज्ञान – कोरोना’ काहीही संबंध नाही! तशाही भारतात 5जी नेटवर्कच्या चाचण्याच नाहीत!!
काय म्हणाली जुही चावला-
- चित्रपट अभिनेत्री चावला यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, आजच्या तुलनेत आरएफ रेडिएशन १०-१०० पट वाढेल.
- या ‘5 जी’ तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या इकोसिस्टमचा मानवी जीवनावरही वाईट परिणाम होईल, असे यात म्हटले आहे.
- जूही चावलाचे प्रवक्ते यांनी शेअर केलेल्या निवेदनामध्ये, ते दाखल करत असलेल्या केस विषयी सांगताना म्हणाले की, याप्रकरणी कोर्टाचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले जावे हे यामागचे उद्देश्य आहे.
- जेणेकरुन ते आहे सिद्ध करू शकतील की, 5 जी तंत्रज्ञान मनुष्य, प्राणी आणि पक्ष्यांसाठी किती सुरक्षित आहे.
- त्यांनी यावर संशोधन केले पाहिजे आणि त्यानंतरच ‘5 जी’ तंत्रज्ञान भारतात येणे सुरक्षित असेल की, नाही हे ठरवले पाहिजे.
- नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊनच त्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा.