मुक्तपीठ टीम
जगभरातील बदलती परिस्थिती लक्षात घेता आपल्या सेनादलांना देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहावं लागत आहे. त्यातही चीन आणि पाकिस्तानची कुरापतखोरी वाढतीच आहे. त्यातच चीनने भारतासभोतलाच्या समुद्रात कारवाया वाढवल्याने सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून नौदलाने तिन्गी सेनादलांचा संयुक्त सागरी सराव आयोजित केला होता. ‘पश्चिम लेहर’ या नावाने पश्चिम किनारपट्टीवर संयुक्त सागरी सराव संपन्न झाला.
या सरावामागे मुख्य उद्देश नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाच्या म्हणजेच वेस्टर्न नेव्हल कमांड ऑपरेशनल प्लॅन्सचे प्रमाणीकरण करणे हा होता. तसेच भारतीय नौदल, वायुदल, भूदल आणि तटरक्षक दल यांच्यातील आंतर-सेवा समन्वय वाढवण्याचाही एक उद्देश होता. हा सराव २० दिवसांच्या कालावधीत आयोजित केला होता. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाच्या ‘एफओसी-इन-सी’च्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.
या सरावात भारतीय नौदलाच्या ४० हून अधिक नौका आणि पाणबुड्यांचे एकत्रीकरण आणि सहभाग यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त भारतीय वायुदलाने आणि भारतीय नौदलाच्या पी ८ आय, डॉरनीयर्स, आयएल ३८ एसडी, मानवरहित हवाई यंत्रणा आणि मिग २९ के या स्ट्राइक विमानांसह “सुखोई ३० एम के आय” आणि जग्वार सागरी स्ट्राइक विमाने, फ्लाइट रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट आणि एवेक्स तैनात केली होती. या सरावासाठी एअर डिफेन्स बॅटऱ्यांसह भारतीय लष्कराच्या विविध घटकांनाही एकत्रित करण्यात आले. प्रदीर्घ कालावधीनंतर अनेक ओपीव्ही, एफपीव्ही आणि तटरक्षक दलाच्या “एअर कुशन वेसेल्स” नी पश्चिम लहर या सरावात भाग घेतला.
सरावा दरम्यान, ऑपरेशनल मिशन आणि विविध कारवाया अंतर्गत कार्यांचे प्रमाणीकरण याशिवाय, वास्तववादी रणनीतिक परिस्थितीमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रामधून गोळीबार करण्यात आला. या सरावामुळे सर्व सहभागी सैनिकी दलांना मुख्यालयाच्या (कमांड) जबाबदारीच्या क्षेत्रांमध्ये, समकालीन सागरी आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी, वास्तववादी परिस्थितीत एकत्र काम करण्याची संधी मिळाली.
पाहा व्हिडीओ:
https://youtu.be/SJL4i3l9dfk