मुक्तपीठ टीम
कोरोना लस टंचाईशी झुंजणाऱ्या आपल्या देशात लवकरच आणखी एका लसीचे उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसींचे भारतात उत्पादन करण्याचा विचार करत आहे. सीरम इन्स्टिट्युट यासारख्या उत्पादकांना उत्पादन वाढविण्यासाठी मदत करण्याचीही तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.
अमेरिकेतील बायडेन प्रशासन कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारताला मदतीसाठी मजबुतीने उभा आहे. त्यामुळे भारताला अमेरिकेकडून वैद्यकीय मदत मिळू लागली आहे.
कोणत्याही लसीचे संयुक्त उत्पादन होण्यास वेळ लागत असल्याने सध्या सीरमसारख्या कंपन्यांना उत्पादनवाढीसाठी मदत करण्यावर अमेरिकेचा भर असेल. त्याच प्रमाणे जगात प्रभावी मानल्या गेलेल्या फायझर लसीलाही भारतात वापरासाठी परवानगी लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.