मुक्तपीठ टीम
नामांतराचा लढा हा कुठल्या भौतिक स्वार्थासाठी नव्हता तर तो लोकशाहीच्या इभ्रतीचा लढा होता. सोळा वर्षांच्या संघर्षानंतर हा लढा यशस्वी झाला. लोकशाहीचा विजय झाला प्रतिक ऐतिहासिक नामांतर आंदोलन असे प्रतिपादन लाँगमार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले. रामबाग, इमामवाडा येथील लाॅंगमार्च चौक येथे गुरुवारी सकाळी ऐतिहासिक लाँगमार्च आंदोलनाचा ४२ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आले, या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी ११ नोव्हेंबर १९७९ साली रामबाग, इमामवाडा येथील मुख्य ऐतिहासिक लाँगमार्च चौकातून जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वात नागपूर ते औरंगाबाद असा ऐतिहासिक लाँगमार्च निघाला होता. या ऐतिहासिक दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महाकारूणीक भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर निळ्या झेंडा फडकवून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलतांना जोगेंद्र कवाडे सर म्हणाले की, आंबेडकरी जनतेला अधिकारी मिळविण्यासाठी वारंवार संघर्श करावा लागतो. समाजाला वारंवार आंदोलकनात्मक लढे उभारूनच न्याय मिळाले. परंतु, नामांतराचा हा लढा केवळ अस्मितेचा होता. या आंदोलनात वक्तांची भाषणे, एकांकिका, नाटिका आणि क्रांतीगीतांची स्फूर्तीने या आंदोलनाला स्वाभिमानी उर्जा देण्याचे काम केले. मानवी मूल्यांसाठी आम्ही हा लढा लढला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा हा लढा होता. त्यात भीमसैनिकांचा विजय झाला, याचा आनंद आहे. नामांतराचा विजय आंदोलनात शहीद झालेल्या भीमसैनिकांचा असून इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदविणारे हे आंदोलन होते असेही जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी शहराध्यक्ष अरुण गजभिये, वैशाली मामासाहेब सरदार, माताजी भिक्कुनी गौतमी, बाळूमामा कोसमकर, कपिल लिंगायत, अजय चव्हाण,केवल कांबळे, ऍड. अरुण महाकाळे, सिद्धार्थ सोमकुंवर, गौतम थुलकर, उषा केवल कांबळे, विपीन गडगीलवार, धर्मपाल सरदार, अरुण साखरकर, सी. जी. रामटेके, ध्येयश्री धर्मपाल सरदार, मोरेश्वर दुपारे, चरंदास गायकवाड, धर्मपाल धाबर्डे, प्रकाश मेश्राम, यमुनाबाई सरदार, कांताताई गायकवाड, मायाबाई रंगारी, रवी बांडमारे, दिलीप पाटील, सुदेश नंदगवळी, ऍड. राणा महाकाळे, राजू कांबळे, पियुष हलमारे, सुरेश बोनदारडे, नीरज पराडकर, स्वप्नील महल्ले, अंकित डोंगरे, नरेश डोंगरेसह पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.