मुक्तपीठ टीम
सरकारी बँकेत नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. स्टेट बँकेने अॅप्रेंटिसशिपसाठी एकूण सहा हजार १०० रिक्त जागा घोषित केल्या आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार २६ जुलै २०२१पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून, शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
३१ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ही ऑलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा यावर केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून माहिती मिळवू शकता.
Bank online form SBI
website