मुक्तपीठ टीम
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) मध्ये जनरल मॅनेजर, डिप्टी जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या पदांवर संधी आहे. अशा व्यवस्थापकीय पदांच्या ८० जागांवर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २ मे २०२२पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक असेल.
- संबंधित क्षेत्रात अनुभवही असणे गरजेचा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा कमी असावे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाईट www.nhai.gov.in ला भेट द्या.
- ‘About’ टॅबवर क्लिक करा आणि “Current Vacancies” या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर भर्ती जाहिरातीवर क्लिक करा आणि ‘आता अर्ज करा’ पर्याय निवडा.
- येथे अर्जाचा फॉर्म स्क्रीनवर दिसेल तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
- अर्जामध्ये विचारलेल्या माहितीनुसार सर्व तपशील भरा.
- १०वी आणि १२वी गुणपत्रिका, ओळखीचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडा.
- आता अर्ज ‘डीजीएम (एचआर आणि प्रशासन) – IA/IB, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्रमांक जी-5 आणि 6, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली-110075 या नमूद केलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवा.
अधिक माहितीसाठी
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वरून माहिती मिळवू शकता.