मुक्तपीठ टीम
कॉसमॉस बँकेत मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ट्रेनी ऑफिसर, लिपिक या पदांवर इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ आणि २- १) फर्स्ट क्लास बीकॉम किंवा एमबीए २) जेएआयआयबी/ सीएआयआयबी/ सीए/ सीएस/ आयसीडब्ल्यूए ३) पद क्र.१ साठी १० वर्षे अनुभव तर, पद क्र.२ साठी ५ वर्ष अनुभव
- पद क्र.३- सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीए इंटर
- पद क्र.४- १) कॉमर्स/ सायन्स/ मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी २९ वर्षांपर्यंत आणि पद क्र.४ साठी २५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कॉसमॉस बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.cosmosbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.cosmosbank.com/career-form.aspx
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1488flaLNey02ATK2kGsVF9BpyyrHlh-f/view