मुक्तपीठ टीम
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पतंजलीने त्यांच्या पतंजली आयुर्वेद संस्थेत मोठी भरती काढली आहे. योगगुरू आणि उद्योगपती बाबा रामदेव आणि उद्योगपती आचार्य बाळकृष्ण यांनी स्थापन केलेल्या पतंजली आयुर्वेद या खासगी क्षेत्रातील कंपनीने फूड व्हर्टिकल, हर्बल कॉस्मेटिक्स डिव्हिजन इत्यादी विभागातील हजारो रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. कंपनीने २० फेब्रुवारी २०२२ रोजी जारी केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या विभागांतर्गत देशभरातील जिल्हा आणि तहसील स्तरावर सेल्स टीम आणि मेडिकल टीम तयार केली जाणार आहे. पतंजली आयुर्वेद संघांमध्ये हजारो रिक्त पदांची घोषणा करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.
पतंजलीमधील नोकरीविषयक महत्तवाची माहिती
पतंजली आयुर्वेदने विविध विभागांमध्ये भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार आणि अधिकृत वेबसाइट, patanjaliayurved.org वर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, कंपनीने विक्री अधिकारी, एरिया सेल्स मॅनेजर, डीएसएम (सेल्स मॅन) आणि टेरिटरी सेल्सच्या हजारो पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली आहे.
शैक्षणिक पात्रता
- पतंजली आयुर्वेदच्या जाहिरातीनुसार फूड प्रोडक्ट्स वर्टिकलमध्ये विक्री अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील किमान पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- उमेदवारांना ४-५ वर्षांचा विक्रीचा अनुभव असावा, ज्यापैकी किमान ३ वर्षे एखाद्या प्रस्थापित/ अग्रणी एफएमसीजी कंपनीमध्ये असणे आवश्यक आहे.
- एरिया सेल्स मॅनेजर पदासाठी उमेदवार पदवीधर आणि ८ वर्षांचा अनुभव असलेला असावा ज्यापैकी किमान ५ वर्षांचा अनुभव एखाद्या प्रस्थापित/ अग्रणी एफएमसीजी कंपनीमधील असावा.
- हर्बल कॉस्मेटिक्स डिव्हिजनमध्ये सेल्स ऑफिसरसाठी, पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, त्यापैकी ३ वर्षे प्रस्थापित/ अग्रणी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
टेरिटरी सेल्स मॅनेजर पदासाठी असलेल्या अटी
पतंजली आयुर्वेद मधील टेरिटरी सेल्स मॅनेजर या पदासाठी, उमेदवाराला ग्रामीण बाजारपेठेतील ३ ते ४ वर्षांच्या विक्रीचा अनुभव असलेले पदवीधर असावेत, त्यापैकी किमान २ वर्षे स्थापित/ अग्रणी एफएमसीजी कंपनीत काम करण्याचा अनुभव असावा. तसेच, उमेदवारांकडे स्वतःचा स्मार्टफोन आणि दुचाकी असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि ईमेलआयडी
- पतंजली आयुर्वेद मधील हजारो नोकऱ्यांसाठी सेल्स पोस्टसाठी उमेदवार त्यांचे बायोडाटा वेगवेगळ्या विभाग/उभ्यानुसार जारी केलेल्या ईमेल आयडीवर पाठवू शकतात.
- फूड वर्टिकल ईमेल आयडीसाठी- foodsales@patanjaliayurved.org
- हर्बल कॉस्मेटिक्स डिव्हिजन ईमेल आयडी- Patanjaliherbalcosmetics@patanjaliayurved.org
- अधिक माहितीसाठीसाठी अधिकृत वेबसाइट, patanjaliayurved.org ला भेट द्या.