मुक्तपीठ टीम
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कावेरी वसतिगृहात रविवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. रामनवमीच्या दिवशी वसतिगृहात मासांहारी भोजन ठेवण्यास आक्षेप घेतला त्यावरून दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंकडील सहा विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व हाणामारीच्या घटनेचे एका व्हिडीओ व्हायरल झालाय.
काय म्हणाले JNUSU आणि ABVP
- JNUSU ने आरोप केला आहे की ABVP च्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या मेसमध्ये मासांहारी खाण्यापासून रोखले आणि हिंसक वातावरण निर्माण केले.
- उजव्या विचारसरणीच्या ABVP ने मात्र हा आरोप फेटाळून लावला आणि असा दावा केला की, वसतिगृहात आयोजित रामनवमी पूजेच्या कार्यक्रमात “डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी” अडथळा आणला.
- माहराण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी संघटांनी वसंत कुंज पोलीस स्थानकासमोर आंदोलन केले.
- बेड्या ठोकत विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये मोर्चा काढला आणि ABVP च्या विरोधात घोषणाबाजी केली.
- त्यांनी “ABVP कार्यकर्त्यांचे” व्हिडिओ देखील शेअर केले ज्यात विद्यार्थ्यांवर वाइपर आणि लाठीने हल्ला होताना दिसत आहे.
- डाव्या संघटनांच्या निषेधार्थ ABVPने कॅम्पसमध्ये मोर्चाही काढला.
- विद्यार्थ्यांचे कथित व्हिडिओ शेअर करून, त्यांनी आरोप केला की “डाव्या-संलग्न संघटना” च्या कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना मारहाण केली.
हाणामारीत सहा जण जखमी
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कावेरी वसतिगृहात रविवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली.
- या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, या घटनेत सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.
- मात्र, दोन्ही बाजूंचे ६० हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे.
काय प्रकरण आहे
- जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (जेएनयूएसयू) ने आरोप केला की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात जेवणासाठी नॉनव्हेज खाणे थांबवले आणि “हिंसेचे वातावरण निर्माण केले.”
- असा दावा केला की “डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना कोवेरी वसतिगृहात रामनवमीची पूजा करण्यापासून रोखले.
दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करून संबंधित सदस्यांना जखमी केल्याचा आरोप केला.
हाणामारीबाबत पोलीस काय म्हणाले?
- दरम्यान, हिंसाचाराशी संबंधित अनेक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये अख्तरिस्ता अन्सारी नावाच्या विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे.
- मात्र, अधिकाऱ्यांनी व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा दिलेला नाही.
- जखमी झालेल्या एकूण सहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिस उपायुक्त (दक्षिणपश्चिम) मनोज सी यांनी सांगितले.
- JNUSU ने आरोप केला की ABVP सदस्यांनी “गुंडगिरी” केली, रहिवाशांना रात्रीच्या जेवण्यासाठी नॉन व्हेज खाणे थांबवले.