Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

इन्फ्रारेड प्रकाशाला नवीकरणीय उर्जेत रुपांतरीत करणाऱ्या नवीन घटकाचा शोध

July 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
infrared light

मुक्तपीठ टीम

उच्च कार्यक्षमतेसह इन्फ्रारेड प्रकाश उत्सर्जित करू शकेल, शोधू शकेल आणि त्यात बदल करू शकेल अशा एका नवीन घटकाचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी सिडनी विद्यापीठासह लावला आहे. सौर आणि औष्णिक ऊर्जा निर्मिती आणि ऑप्टिकल दूरसंवाद उपकरणांच्या निर्मितीसाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकते.

विद्युत चुंबकीय लहरी हा एक असा अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे जो वीज निर्मिती, दूरसंचार, संरक्षण आणि सुरक्षा तंत्रज्ञान, सेन्सर्स आणि आरोग्य सेवांसाठी वापरला जातो. शास्त्रज्ञ अशा लहरी अचूकपणे हाताळण्यासाठी उच्च-तंत्रज्ञान पद्धती वापरतात. ज्यामध्ये मानवी केसांपेक्षा हजारो पटीने लहान असलेल्या परिमाणांमध्ये, विशिष्ट सामग्री वापरून अशा लहरी हाताळल्या जातात. प्रकाशाच्या विशेषतः इन्फ्रारेड प्रकाशाच्या सर्व विद्युत चुंबकीय लहरी वापरणे हे तितकेसे सोपे नाही, कारण ते शोधणे आणि त्यात आवश्यक बदल करणे क्लिष्ट आणि कठीण असते.

इन्फ्रारेड प्रकाशाच्या प्रयोगासाठी, कुशाग्र आणि अत्याधुनिक सामग्रीची आवश्यकता आहे जी उच्च कार्यक्षमतेसह इच्छित स्पेक्ट्रल श्रेणीमध्ये उत्तेजन, मॉड्युलेशन आणि आवश्यक शोधासाठी उपयुक्त ठरेल. इन्फ्रारेड स्पेक्ट्रल श्रेणीमधील प्रकाश-द्रव्यांचे परस्परसंवाद घडवून आणण्यात सध्या परिचित असलेले केवळ काही विद्यमान घटक होस्ट म्हणून काम करू शकतात आणि त्यांची कार्यक्षमता देखील अत्यंत कमी आहे. अशा घटकांच्या कार्यान्वयन प्रक्रियेत स्पेक्ट्रल श्रेणीमध्ये औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या लहान तरंगलांबी इन्फ्रारेड (SWIR) श्रेणी देखील समाविष्ट नाहीत.

यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनात, बेंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्राच्या (JNCASR), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी एकल-क्रिस्टलाइन स्कॅन्डियम नायट्राइड (ScN) नावाचा नवीन घटक शोधला आहे जो उच्च कार्यक्षमतेसह इन्फ्रारेड प्रकाश उत्सर्जित करू शकेल, शोधू शकेल आणि त्यात बदल घडवू शकेल.

के.सी. मौर्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलरिटॉन एक्सिटेशन नावाच्या वैज्ञानिक घटनेचा उपयोग केला आहे. ज्यावेळी प्रकाश सामूहिक मुक्त इलेक्ट्रॉन दोलन किंवा ध्रुवीय जाळीच्या कंपनांसह एकरूप होतो त्यावेळी पोलरिटॉन एक्सिटेशन घडून येते आणि आवश्यक परिणाम साध्य होतो.

ध्रुवीय कण (अर्ध-कण) उत्तेजित करण्यासाठी आणि इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करून सिंगल-क्रिस्टलाइन स्कॅन्डियम नायट्राइड (ScN) मध्ये मजबूत प्रकाश-पदार्थ परस्परसंवाद साधण्यासाठी या वैज्ञानिक तत्वाचा प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक केला आहे . ScN मधील हे ध्रुवीकरण सौर आणि औष्णिक उर्जा निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते. तसेच, गॅलियम नायट्राइड (GaN) सारख्या सामग्रीशी साधर्म्य असणारे, स्कँडियम नायट्राइड हे आधुनिक अशा -मेटल-ऑक्साइड-सेमिकंडक्टर (CMOS) शी सुसंगत आहे. आणि म्हणूनच, Si-chip ऑप्टिकल साठी ते सहजपणे एकत्रित केले जाऊ शकते.

“इलेक्ट्रॉनिक्सपासून ते आरोग्यसेवा, संरक्षण आणि सुरक्षा ते ऊर्जा तंत्रज्ञानापर्यंत, इन्फ्रारेड स्त्रोत, उत्सर्जक आणि सेन्सर्सची मोठी मागणी आहे. स्कॅंडियम नायट्राइडमधील इन्फ्रारेड पोलारिटॉन्सवरील आमचे कार्य अशा अनेक उपकरणांमध्ये उपयुक्त ठरेल.” असे JNCASR चे डॉ. बिवास सहा यांनी सांगितले. नॅनो लेटर्स या वैज्ञानिक जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अभ्यासात JNCASR व्यतिरिक्त भारतीय विज्ञान संस्था (IISc.) आणि सिडनी विद्यापीठातील सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड इंजिनीअरिंगचे संशोधकही सहभागी झाले होते.

Publication:

  • https://pubs.acs.org/doi/pdf/10.1021/acs.nanolett.2c00912
  • Contact details: Dr. Bivas Saha email: bsaha@jncasr.ac.in mobile: 63601 26595

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsinfrared lightJNCASRmuktpeethrenewable energy conversionइन्फ्रारेड प्रकाशचांगली बातमीनवीकरणीय उर्जा रुपांतरमुक्तपीठ
Previous Post

सत्तासंघर्ष संपल्यानंतर एक आमदार असा, गावी परतला भातशेतीत राबू लागला!

Next Post

राज्यात स्टार्टअपचे जाळे मुंबई-पुण्याबाहेर विस्तारण्यासाठी महाराष्ट्र काय करतोय?

Next Post
Principal Secretary Manisha Verma

राज्यात स्टार्टअपचे जाळे मुंबई-पुण्याबाहेर विस्तारण्यासाठी महाराष्ट्र काय करतोय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!