Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात 5G: जिओ 5G या महिन्यात लाँच होण्याची शक्यता!!

August 3, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
jio 5g

मुक्तपीठ टीम

देशात ५जी नेटवर्क सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलायन्स जिओने ५जी स्पेक्ट्रम लिलाव जिंकला आहे. ५जी स्पेक्ट्रम अंतर्गत ५१२३६Mhz स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला आहे. स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ इन्फोकॉमने सर्वाधिक बोली जिंकली आहे. ५जी लिलाव एकूण १,५०,१७३ कोटी रुपयांना झाला आहे, एकट्या जिओने ८८,०७८ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे, म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक स्पेक्ट्रम जिओच्या ताब्यात आहे. रिलायन्सने एकूण २४,७४० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. रिलायन्सने ७००मेगाहर्ट्झ , ८००मेगाहर्ट्झ , १८००मेगाहर्ट्झ, ३३००मेगाहर्ट्झ आणि २६गिगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी बोली लावली.

जिओचे ५जी नेटवर्क १५ ऑगस्टला लाँच होण्याची शक्यता

  • जिओची ५जी सेवा १५ ऑगस्टला लाँच होण्याटी शक्यता आहे.
  • रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी स्पष्ट केले की, जिओ ५जी लाँच करून आझादीचा अमृत महोत्सव साजरा करेल.
  • जिओने २२ सर्कलसाठी ५जी स्पेक्ट्रम विकत घेतला आहे.

आकाश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारत जगातील एक मोठी आर्थिक शक्ती बनेल यावर आमचा नेहमीच विश्वास आहे. याच व्हिजन आणि खात्रीने जिओला जन्म दिला. जिओच्या ४जी रोलआउटचा वेग, स्केल आणि सामाजिक प्रभाव जगात अतुलनीय आहे आणि आता जिओ भारतात ५जी तंत्रज्ञानामध्ये आघाडी घेण्यास सज्ज आहे.

ते पुढे म्हणाले, “जिओ जागतिक दर्जाची, परवडणारी ५जी सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही सेवा, प्लॅटफॉर्म आणि उपाय प्रदान करू जे भारताची डिजिटल क्रांती घडवून आणतील, विशेषत: शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स यासारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये. माननीय पंतप्रधानांचे डिजिटल इंडिया मिशन साकार करण्यात हे आमचे पुढचे अभिमानास्पद योगदान आहे.

५जी स्पेक्ट्रम खरेदी करण्यात एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

  • ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव आता संपला आहे.
  • यामध्ये जिओने सर्वाधिक स्पेक्ट्रम जिंकला आहे.
  • भारती एअरटेलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • भारती एअरटेलने १९८६७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे.
  • त्याच वेळी, व्होडाफोन-आयडियाने ६२२८ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे.
  • अदानी डेटा नेटवर्कने २६गिगाहर्ट्झ एअरवेव्ह स्पेक्ट्रमसाठी बोली लावून ४००मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतला आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: 5G spectrum५जी स्पेक्ट्रमgood newsJio 5G Networkmuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीजिओ ५जी नेटवर्कमुक्तपीठ
Previous Post

प्रदूषणमुक्त वाहतुकीचं रेल्वेचं लक्ष्य, सौरऊर्जेवर भर, मुंबईच्या नव्या मेट्रो मार्गांसाठीही सौर ऊर्जा!

Next Post

आता विमान प्रवाशांकडून बोर्डिंग पाससाठी अतिरिक्त शुल्क वसुली नाही

Next Post
indian flights

आता विमान प्रवाशांकडून बोर्डिंग पाससाठी अतिरिक्त शुल्क वसुली नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!