मुक्तपीठ टीम
महिला दिन म्हटलं की महिला वर्गासाठी आपला हक्काचा दिवस. गल्ली ते दिल्लीच नाही तर जगभरात महिलांचा उत्साह उत्सवासारखा असतो. झडपोली या गावात साजरा झालेल्या महिला दिन मेळाव्याचा उत्साह हा मोठा होता.
- महिलांची प्रचंड गर्दी.
- किमान पंधरा हजारावर उपस्थितीचा दावा.
- आलेल्या महिला वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील.
- वागण्या-बोलण्यातील सर्वांचाच प्रचंड उत्साह मात्र सारखाच.
- त्यांची वेशभुषा सणावाराला असते तशी उत्सवी.
- पुन्हा हे सारं घडलं ते एखाद्या मोठ्या महानगरात नाही तर एका गावात.
- जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यातील ही दृश्यं मनाला भावणारी.
- संपूर्ण मेळावाच महिलांची शक्ती दाखवणारा.
- निलेश सांबरेंच्या मातोश्री गर्दीतील महिलांसोबत समरस!
सर्वात महत्वाचं म्हणजे जिजाऊचं सर्व कार्य हे देणगी न घेता जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरेंच्या स्वकमाईतून समाजसेवेच्या धोरणानुसार चालतं. मात्र, त्यांच्या आई भावनादेवी भगवाना सांबरे या स्वत: तिथं जमलेल्या गर्दीत जमिनीवर मांडी घालून बसल्या होत्या.सामान्य महिलांसोबत समरस झाल्या होत्या.
महिलांच्या रंगतदार कार्यक्रमांचा समावेश
- लाठी काठी मुलीचे प्रात्यक्षिकं, तारपा नृत्य, विविध गाण्यासह नृत्य आणि फॅशन शोमुळे महामेळाव्याची रंगत वाढली होती.
- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे महिलादिनानिमित्त आयोजित भव्य दिव्य सोहळा ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून १५ हजार महिलांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था समर्थपणे सांभाळणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आशाताई, परिचारिका, डॉक्टर, पोलिस व स्वयंरोजगार करणाऱ्या महिला तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महामेळाव्याची रंगत वाढवणारे महिलांचे कार्यक्रम
- वाडा टीम जिजाऊच्या वतीने स्वागत गीत
- सोहळा निरविघ्न पार पडण्यासाठी जिजाऊ स्वयंसेविका ठाणे शहरातील महिलांनी गणेशाला साकडं घालून नृत्य सादर केले.
- महिलादिनानिमित्त जिजाऊ बचतगट मेढी, दोडीपाडा / महिलांवर आधारित गाणं.
- प्रत्येक महिलेने स्वरंक्षण करावे यासाठी लाठी-काठी सादर.
- तारपा नृत्य / जव्हार स्वयंसेवक
- ठाणे, भिवंडी, मुरबाड, शहापुर, जव्हार, पालघर व विक्रमगडमधील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचा सत्कार.
- स्त्री-भ्रुण हत्या नाटक
- ठाणे शहर टीम, नृत्य
- मोखाडा महिला भजन
- जिजाऊ महिला मंडळ ठाणे / पारंपारिक नृत्य
- जामधर / जिजाऊ लेकी गीत
- शेंद्रुण पीएचसीच्या मेडीकल ऑफीसर डॉ.रुपाली अशोक शेडगे व त्यांच्यासोबत त्यांच्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी सादर केले मंगळागौर नृत्य.
- जिजाऊ संस्थेचे ट्रेनर श्री.परेश कारंडे सरांचे मार्गदर्शन.
- पोवाडा/ कोरोना / अंगणवाडी सेविका खार्डे विभाग
- एक पात्री नाटक, अंगणवाडी सेविका आदर्श नगर/ शहापूर
- जिजाऊ स्वयंसेविका शहापुर
- मालोडी गाव/ पथनाट्य
- ठाणे शहर टीम नृत्य
- स्त्री जन्माची कहाणी/ जिजाऊ बचत गट, पवाळे
- उषा भास्कर/ महिलादिन गीत
- रेश्मा कराळे/ गीत
- लता रमेश पवार/ चारोळी
- पारंपारिक नृत्य/ मालोडी
- जिजाऊ ठाणे शहर टीमच्या वतीने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा.श्री.निलेशजी भगवान सांबरे यांना व त्यांच्या कार्याला सलामी.
- फॅशन शो/ भिवंडी तालुका
तसेच कार्यक्रमास अॅड. हेमांगी दत्तात्रय पाठारे, अॅड. शबनम काझी व अॅड. सुजाता जाधव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे, आई सौ.भावनादेवी भगवान सांबरे, जिजाऊ संस्था महिला सक्षमीकरण पालघर जिल्हा प्रमुख सौ.हेमांगीताई पाटील, जिजाऊ संस्था महिला सक्षमीकरण ठाणे जिल्हा प्रमुख सौ.मोनिकाताई पानवे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
पाहा व्हिडीओ: